AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिलासादायक! राज्यात आज 14,152 नव्या रुग्णांची नोंद, 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 14,152 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Corona Virus 04 june 2021

दिलासादायक! राज्यात आज 14,152 नव्या रुग्णांची नोंद, 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Corona Virus 04 june 2021
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 8:58 PM
Share

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात आज 14,152 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 04 june 2021 Found 14,152 New Patients)

राज्यात आज 14,152 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 14,152 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 289 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,152 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 1,96,894 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 58,05,565 झालीय.

राज्यात आज 20,852 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 20,852 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 55,07,058 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.86 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,60,31,395 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,05,565 (16.11 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत दिवसभरात 973 रुग्णांची नोंद

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्क्यांवर पोहोचलाय. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 515 दिवसांवर गेलाय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 1 हजार 207 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 76 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत 16 हजार 347 रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत दिवसभरात 973 रुग्णांची नोंद झालीय.

संबंधित बातम्या

व्होकार्ट हॉस्पिटल अर्धनग्न आंदोलनप्रकरणी तब्बल 10 दिवसांनी जितेंद्र भावेंवर गुन्हा दाखल

कोरोनामुळे हजारो कैदी पॅरोलवर बाहेर, रोजगाराच्या प्रश्नामुळे पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा

Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 04 june 2021 Found 14,152 New Patients

Follow Us
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल