AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra E-Pass | ई-पास कसा मिळवाल? अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. (Maharashtra E-Pass application filling guidelines)

Maharashtra E-Pass | ई-पास कसा मिळवाल? अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 24, 2021 | 1:10 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर निर्बंधाची घोषणा केली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा, तसेच अर्ज भरण्यासाठी काय करावे, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra E Pass application filling guidelines)

?ई-पास कसा काढायचा??

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.

स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा. स्टेप 2: तुमचे संपूर् नाव नोंद करा. स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा. स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा. स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा. स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा. स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा. स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा. स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

?ई-पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना?

  • शासकीय कर्मचारी/ वैद्यकीय कर्मचारी/ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही
  • २१ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांत्सव मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल
  • पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे.
  • आवश्यक ती कागदपत्र जोडून अर्ज केल्यास अर्जदारास अर्जात नमूद वैध कारणास्तव ई-पास वितरीत करण्यात येईल.
  • अत्यावश्यक सेवा/ शासकीय सेवा/ वैद्यकीय सेवांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाच्या प्रवासाकरिता ई पास आवश्यक नाही. त्यांना ओळखपत्रांच्या आधारे प्रवासाची मुभा देण्यात येईल.
  • मुंबई शहरात प्रवास करण्यास, अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी ई-पासची आवश्यकता नाही.
  • सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
  • अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्र एका फाईलमध्ये एकत्र करा
  • फोटोची साईझ 200 केबीपेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्ताऐवजांची साईज ही 1 MB पेक्षा जास्त नसावी
  • अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा
  • संबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी आणि मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता.
  • ई-पासमध्ये तुमचे वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.
  • प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी/ हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलिसांनी विचारले असता त्यांना आपला ई-पास दाखवा किंवा तुम्ही तो प्रिंट करुन वाहनावर चिकटवू शकता.
  • ई-पासची डुप्लीकेट प्रत बनवणे. तसेच वैध तारखेनंतर किंवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

(Maharashtra E-Pass application filling guidelines)

संबंधित बातम्या : 

मुंबई महापालिका आता घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार; 10 जणांचं पथक, 10 रुग्णवाहिका सज्ज

Maharashtra Lockdown E-pass : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा? सोप्या टिप्स

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान