
महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. एकूण 288 विधानसभा मतदारसंघात 4140 उमेदवार रिंगणात आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्यांच जास्त लक्ष आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, तर ठाणे जिल्ह्यात 18 जागा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातून येतात. त्यामुळे ठाण्याच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. मुंबईत 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई कोणाची ते उद्या स्पष्ट होईल. शिवसेना एकसंध असताना मुंबईवर ठाकरेंच वर्चस्व होतं. पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे, या प्रश्नाच उत्तर आज मिळेल. महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांचे 11 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गट 15 आणि भाजपाने 18 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 18 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं? इथे क्लिक करुन निकाल पहा
मुंबईतल्या 36 जागांचा निकाल एका क्लिकवर, बघा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं? इथे क्लिक करुन निकाल पहा
शिवडी विधानसभेत मतमोजणीच्या 19 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. अजय चौधरी हे 7140 मतांनी विजयी झाले आहेत. अजय चौधरी यांना 74890 मतं मिळाली. मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 67750 आणि अपक्ष उमेदवार नाना आंबोले यांना 5925 मतं मिळाली.
विक्रोळीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत निवडणूक लढवत होते. त्यांनी 15352 मतांनी विजय मिळवला आहे. सुनील राऊत यांना एकूण 65715 मतं मिळाली. शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा कारंजे यांना 50363 आणि मनसेचे विश्वजीत ढोलम यांना 16716 मतं मिळाली.
शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे 21278 मतांनी आघाडीवर आहेत. 29 पैकी 12 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालीय. काँग्रेसचे नसीम खान आणि मनसेचे महेंद्र भानुशाली यांचं आव्हान होतं.
राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार. कल्याण ग्रामीणमध्ये ते पिछाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे हे 43786 मतांनी आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे गटाचे सुभाष भोईरही पिछाडीवर आहेत. 32 पैकी 17 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.
विक्रोळीत संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आघाडीवर आहेत. 18 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. ते 15705 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा कारंजे आणि मनसेचे विश्वजीत ढोलम पिछाडीवर आहेत.
भांडूप पश्चिमेला काँटे की टक्कर सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर हे फक्त 623 मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील यांना 44202 मत मिळाली आहेत. कोरगावकर यांना 43579 आणि मनसेच्या शिरीष सावंत यांना 12986 मतं मिळाली आहेत.
कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर, चारकोपमधून भाजपचे योगेश सागर विजयी झाले आहेत. मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी आहेत.
मानखुर्द-शिवाजी नगरमधून समाजवादी पार्टीने अबू आझमी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या नवाब मलिक यांचा त्यांनी पराभव केला.
अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल विजयी. मूळचे भाजपचे असलेले मुरजी पटेल यांनी निवडणुकीच्या तोंडावर तिकीटासाठी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा पराभव झाला आहे.
वरळी विधानसभा क्षेत्राच्या 7 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे 1047 मतांनी आघाडीवर आहेत. 7 फेऱ्यानंतर आदित्य यांना 25304 मतं मिळाली आहेत. मिलिंद देवरा यांना 24257 मतं मिळाली आहेत. संदीप देशपांडे यांना 10246 मत मिळाली आहेत.
माहीम विधानसभा क्षेत्राच्या 6 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत 7830 मतांनी आघाडीवर आहेत. 6 फेऱ्यानंतर सावंत यांना 19562 मत मिळाली आहेत. सदा सरवणकर यांना 11732 मतं मिळाली आहेत. अमित ठाकरे यांना 8269मत मिळाली आहेत.
शिवडी विधानसभा क्षेत्राच्या 10 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी 9404 मतांनी आघाडीवर आहेत. 10 फेऱ्यानंतर चौधरी यांना 42619 मत मिळाली आहेत. मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 33215 मतं मिळाली आहेत. नाना आंबोले यांना 3347 मत मिळाली आहेत.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण 5 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे.
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अँड आशिष शेलार – 25,590
आसिफ झकेरिया – 10,775
आशिष शेलार याची आघाडी – 14,815
चेंबूरमध्ये आतापर्यंत सहाफेऱ्यांची मतमोजणी झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातरपेकर 14514
शिवसेना शिंदे गटाचे तुकाराम काते- 14758
माऊली थोरवे- 1313
दीपक निकाळजे 4821
तुकाराम काते निसटत्या फरकाने आघाडीवर
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ नववी फेरी
फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार – २९५८५
सना मलिक राष्ट्रवादी- २३१६६
नवीन आचार्य मनसे – ११२२०
सतीश राजगुरू वंचित २३९०
फहाद अहमद – ६४१९ मतांनी आघाडीवर
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात सहा राऊंडची मतमोजणी झाली आहे.
सहावा राऊंड
झिशान सिद्धीकी – १३१४३
तृप्ती सावंत – ७२०२
वरूण सरदेसाई – १७४८६
शिवसेना ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई आघाडीवर
मुंबईतून पहिला निकाल जाहीर झाला आहे. वडाळ्यात भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव आणि मनसेच्या स्नेहल जाधव यांचं आव्हान होतं.
“माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, कुछ तो गडबड हैं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 जागा कोणत्या भरवशावर मिळतात?. अजित पवार यांना 40 च्या वर जागा मिळतात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी असे काय दिवे लावले? इथे त्यांना 120 पेक्षा जास्त जागा मिळतात अशी प्रतिक्रिया निकालावर संजय राऊत यांनी दिली आहे.
शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी 6250 मतांनी आघाडीवर आहेत. मनसेचे बाळा नांदगावकर यांची पिछाडी वाढत चालली आहे.
वांद्रे पूर्वमधून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी 3839 मतांनी पिछाडीवर आहेत.
भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर आघाडीवर आहेत. चारकोपमधून योगेश सागर 20 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. भायखळ्यातून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव 1108 मतांनी आघाडीवर आहेत.
वरळीतही अटीतटीचा सामना सुरु आहे. आदित्य ठाकरे फक्त 696 मतांनी आघाडीवर आहेत. माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर पिछाडीवर आहेत. महेश सावंत आघाडीवर आहेत. दिंडोशीमधून सुनील प्रभू पिछाडीवर आहेत.
शिवडी विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी 1969 मतांनी आघाडीवर आहेत. मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर आहेत.
शिवडीतून अजय चौधरी फक्त 356 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं आव्हान आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघातून आता उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे. मनसेच्या अमित ठाकरे आणि महेश सावंत यांच्या मतांमध्ये फार थोडा फरक आहे. अमित ठाकरे यांच्याकडे 2156 तर महेश सावंत यांना 2,270 मतं आहेत. सदा सरवणकर तिसऱ्या स्थानावर आहेत.
मुलुंडमधून भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा 4580 मतांनी आघाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीत मिहिर कोटेचा यांचा महाविकास आघाडीच्या संजय पाटील यांनी पराभूत केलं होतं.
वडाळ्यात भाजप उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी दुसऱ्या फेरीत 5486 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव आणि मनसेच्या स्नेहल जाधव यांचं आव्हान आहे.
वरळीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आदित्य ठाकरे हे 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या संदीप देशपांडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांचं आव्हान आहे.
मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मंगलप्रभात लोढा 3013 मतांनी आघाडीवर आहेत.
डोंबिवलीतून भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण 2800 मतांनी आघाडीवर आहेत. ठाणे शहरमधून भाजप उमेदवार संजय केळकर आघाडीवर आहेत. बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे आघाडीवर आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत. 3 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. त्यांच्यासमोर अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचं आव्हान आहे.
कल्याण पूर्वमधून भाजपच्या सुलभा गायकवाड आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी करणाऱ्या महेश गायकवाड यांचं आव्हान आहे.
मुंबईत भाजपचे उमेदवार 12 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गट 3 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 4 आणि उद्धव ठाकरे गट 5 जागांवर आघाडीवर आहे. मनसेचा उमेदवार एका जागेवर आघाडीवर आहे.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजन नाईक पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत, तर क्षितीज ठाकूर पिछाडीवर आहेत. मतदानाच्या आदल्यादिवशी याच मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाला होता.
विलेपार्ल्यातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी आघाडीवर आहेत. सायन-कोळीवाड्यातून भाजपचे उमेदवार तमिल सेल्वन आघाडीवर आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अमित साटम आघाडीवर आहेत.घाटकोपर पश्चिममधून भाजपचे उमेदवार राम नाईक आघाडीवर आहेत.
वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर आघाडीवर आहेत.
कांदीवली पूर्वमधून भाजपचे अतुल भातखळकर, दिंडोशीमधून उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू आणि भांडूप पश्चिममधून उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आघाडीवर आहेत.
चेंबूरमधून उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर, दहीसरमधून भाजपा उमेदवार मनिषा चौधरी आघाडीवर आहेत. मुंबादेवीमधून काँग्रेस उमेदवार अमिन पटेल आघाडीवर आहेत.
माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान आहे.
शिवडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर मनसेच्या बाळा नांदगावकरांच आव्हान आहे.
मागाठणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश सुर्वे आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी सुरु आहे.
मालाडमधून काँग्रेसचे अस्लम शेख आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी सुरु आहे.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार आशिष शेलार आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे झिशान सिद्दीकी आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्घव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत.
सकाळी 8 वाजता आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर EVM मधील प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होईल. आजच्या निकालाकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे.
ठाणे जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: ठाण्यातून येतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या निकालाकडे सगळ्या राज्याच लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडीतून उभे आहेत. त्यांच्यासमोर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंच आव्हान आहे. त्याशिवाय कळवा-मुंब्र्यातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या निकालाकडेही सगळ्यांच लक्ष आहे.
मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या 36 जागांसाठी एकूण 420 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईत शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.