MPSC सोबतच MBBS परीक्षाही पुढे ढकलली, मेटेंकडून स्वागत, आव्हाडांनी मानले आभार

MPSC सोबतच MBBS परीक्षाही पुढे ढकलली, मेटेंकडून स्वागत, आव्हाडांनी मानले आभार

राज्य सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर MBBSच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलीय

सागर जोशी

|

Apr 09, 2021 | 3:58 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी 11 एप्रिल म्हणजे रविवारी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी पालक यांच्याकडून करण्यात येत होती. ही मागणी आणि परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेता राज्य सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर MBBSच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलीय. (Maharashtra government decides to postpone MPSC and MBBS exams)

परिस्थिती पाहून परीक्षेच्या तारखा जाहीर होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा  एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत  असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

‘विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही’

ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे  विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

आव्हाडांनी आभार मानले

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महिन्याभरातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसंच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडूनही परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्य सरकारनं रविवारी होणारी MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. तसंच त्यांचे आभारही मानले आहेत.

विनायक मेटेंकडून स्वागत

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचं स्वागत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलंय. 11 तारखेनंतर जे विद्यार्थी परीक्षेला बसतील, ज्यांना वयाची अडचण येईळ त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

परीक्षा रद्द करण्याची मागणी कोणी केली होती?

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन पुन्हा चर्चा

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

संबंधित बातम्या :

MPSC exam: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अखेर MPSC परीक्षा पुढे ढकलली

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी, वाहतुकीसह वयोमर्यादेचा मुद्दा

Maharashtra government decides to postpone MPSC and MBBS exams

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें