AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. MPSC PSI selected students training

PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मंत्रालय
| Updated on: May 12, 2021 | 6:26 PM
Share

मुंबई: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (PSI) 2017 आणि 2018 च्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएसीनं पोलीस उपनिरीक्षक सरळसेवा परीक्षा 2108 आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण पात्र 737 उमेदवारांना जून 2021 पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी जाहीर केला आहे. सदरचे प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून सुरु करण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil announced MPSC PSI selected students training will start from June 2021)

दिलीप वळसे पाटील यांचं ट्विट

737 उमेदवारांना दिलासा मिळणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक भरतीमधील निवड झालेल्या आणि 2017 मध्ये  खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2017 मधील एकूण 737  उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. या उमेदवारांचं प्रशिक्षण जून महिन्यापासून सुरु होईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

SRPF जवानांना मोठा दिलासा, बदलीसाठी 15 वर्षाची अट रद्द

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला.एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या:

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महापोर्टलच्या परीक्षा घेण्यास MPSC तयार

MPSC Exam | आधी परीक्षा घ्या म्हणून रस्त्यावर आंदोलन, आता काय नको म्हणून उतरणार? उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

(Maharashtra Home Minister Dilip Walse Patil announced MPSC PSI selected students training will start from June 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.