मुंबई लोकलवर निर्बंध आवश्यक, 14 जिल्हे रेड झोनमध्ये, कडक लॉकडाऊन गरजेचा : विजय वडेट्टीवार

लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे (Mumbai corona) रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर (Mumbai Local) काही दिवस निर्बंध लावावाच लागेल, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबई लोकलवर निर्बंध आवश्यक, 14 जिल्हे रेड झोनमध्ये, कडक लॉकडाऊन गरजेचा : विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार, काँग्रेस
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 1:39 PM

मुंबई : लोकल बंद असल्यामुळे मुंबईत कोरोनाचे (Mumbai corona) रुग्ण कमी झाले आहेत. मुंबई लोकलवर (Mumbai Local) काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. 15 दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागणार आहे, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, असंही विजय वडेट्टीवारांनी नमूद केलं. (Mumbai local restrictions required more, 14 districts in red zone, need strict lockdown said Minister Vijay Wadettiwar )

विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा. लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागेल”

परीक्षा रद्द करण्यावर ठाम

दरम्यान, दहावीच्या परीक्षावरुन कोर्टाने सरकारकडे विचारणा केली आहे. मात्र दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. दोन दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

मराठा आरक्षण

सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यामुळे मराठा आरक्षण रद्द झालं आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारच्या हातात काही राहिले नाही. केंद्र सरकारने कलम 102 निर्णय घेतला पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

कोर्टाने गायकवाड आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. हे तत्कालिन राज्य सरकारचे दुर्लक्ष म्हणावं लागेल. त्यांनी निवडणुकीच्या वेळी घाईगडबडीत निर्णय घेतला, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

चंद्रकांत पाटील भावनांशी खेळतात

सारथी संस्था सध्या माझ्याकडे नाही. अजितदादांनी या संस्थेच्या इमारतीसाठी 120 कोटी रुपये दिले. शिवाय 500 कोटी अण्णासाहेब पाटील महामंडळाला दिले आहेत. चंद्रकांत पाटील हे विरोधी आहेत. लोकांच्या भावनेशी ते खेळत राहणार म्हणजे ते चर्चित राहतील, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.

महाराष्ट्रात 31 मेपर्यंत लॉकडाऊन 

महाराष्ट्र सरकारने येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Maharashtra Lockdown Extended Till 31 January 2021)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतात काही रुग्ण आढळत आहे. त्यामुळे सरकारकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या 31 जानेवारी 2021 पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या   

Maharashtra Lockdown: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं?; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ कानमंत्र

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.