AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 मराठी EXCLUSIVE | आतली बातमी, महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी, कुणाला संधी, कुणाला डच्चू?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागा वाटपावर उद्या अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. मात्र बऱ्याच ठिकाणी महायुतीतल्या तीनही पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Tv9 मराठी EXCLUSIVE | आतली बातमी, महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी, कुणाला संधी, कुणाला डच्चू?
mahayutiImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Mar 04, 2024 | 10:20 PM
Share

मुंबई | 4 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या निवडणुकीला कुणाकुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांवर कुणाकुणाला उमेदवारी द्यावी, यासाठी प्रत्येक पक्षांच्या गोटात जोरदार खलबतं आतापर्यंत झाली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गोटात सातत्याने चर्चासत्र घडून येत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची आता जागावाटपाबाबत होत असलेली चर्चा आता अंतिम टप्प्यावर आली आहे. महाविकास आघाडीच्या गोटात घडणाऱ्या घडामोडींची सातत्याने माहिती समोर येत होती. कारण मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विस्तृत बैठका पार पडल्या. याशिवाय देशातील इंडिया आघाडीतही जोरदार खलबतं झाली. असं असलं तरी भाजपप्रणित एनडीएने इंडिया आघाडीच्या आधी बाजी मारत लोकसभेच्या देशातील 197 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पण यामध्ये महाराष्ट्राच्या जागांचा समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीतून कुणाला कोणत्या जागेवरुन संधी मिळणार? हा प्रश्न गुलदस्त्यात होता. पण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागा वाटपावर उद्या अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं. मात्र बऱ्याच ठिकाणी महायुतीतल्या तीनही पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा पुढच्या 2 दिवसांत संपण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. सध्याच्या स्थितीत भाजपनं 23 जागांवर निरीक्षकांची नियुक्ती करुन विद्यमान खासदारांच्या 23 जागा लढणारच, असे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 22 जागांची मागणी केलीय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची 10-12 जागांची मागणी आहे.

महायुतीतल्या संभाव्य उमेदवारांची भाजपची यादी

  • उत्तर मुंबई – विनोद तावडे किंवा पियूष गोयल
  • ईशान्य मुंबई मनोज कोटक
  • उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजनांच्या नावाची शक्यता आहे
  • बीड – पंकजा मुंडे
  • सातारा – उदयनराजेंच्या नावाची शक्यता आहे
  • चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार किंवा अशोक जीवतोडे
  • छत्रपती संभाजीनगर – भागवत कराड किंवा अतुल सावे
  • पुणे – मुरलीधर मोहोळ
  • धुळे- प्रदीप दिघावकर
  • नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
  • जालना – रावसाहेब दानवे
  • अकोला – संजय धोत्रे
  • नागपूर – नितीन गडकरी
  • नंदूरबार – विजयकुमार गावित किंवा हिना गावित
  • पालघरमधून राजेंद्र गावितांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे
  • रावेर – रक्षा खडसे किंवा केतकी पाटील
  • शिर्डी – रामदास आठवलेंना भाजप तिकीट देऊ शकते
  • सोलापूर – अमर साबळे
  • भंडारा गोंदिया – सुनिल मेंढे
  • गडचिरोली – चिमुर अशोक नेते
  • भिवंडी – कपिल पाटील
  • सांगली – संजय काका पाटील
  • दिंडोरी – डॉ. भारती पवार
  • धाराशीव – बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरुळे
  • अमरावती – नवनीत राणा भाजपकडून लढू शकतात
  • अहमदनगर – सुजय विखे पाटील

शिंदेंच्या शिवसेनेचेही काही उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे

  • दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
  • मावळ- श्रीरंग बारणे
  • वाशिम-यवतमाळ – संजय राठोड
  • नाशिक – हेमंत गोडसे
  • बुलडाणा – प्रतापराव जाधव
  • हातकणंगले – धैर्यशील माने
  • हिंगोली – हेमंत पाटलांची शक्यता आहे
  • वर्धा – रामदास तडस
  • रामटेक – कृपाल तुमानेंच्या नावाची शक्यता आहे

कोणत्या जागांवर तिढा?

काही जागा अशा आहे की जिथं एकाच जागेवर मित्रपक्षांचाच दावा आहे, ज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत किंवा भाजपकडून नारायण राणेंना मिळू शकते. माढ्यातून भाजपकडून रणजीत निंबाळकर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर उभे राहू शकतात. रायगडमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. तर बारामतीत अजित पवारांचीच्याच पत्नीचं नाव निश्चितच आहे. सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित असून नणंद भावजय असा सामना होईल. काही जागांवर तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती झालेली नाही. मात्र अंतिम जागा वाटप झाल्यावर पुढच्या 3-4 दिवसांत आणखी चित्र स्पष्ट होईल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.