AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा मला मारलं… एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी डिवचले

राज्यात सत्ताधारी महायुतीत अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांकडे भाजप नेत्याची तक्रार केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

बाबा मला मारलं... एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी डिवचले
Uddhav Thackeray eknath shinde
| Updated on: Nov 20, 2025 | 2:03 PM
Share

राज्यात सध्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे सत्ताधारी महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट तक्रार अमित शाहांकडे केल्याचे बोललं जात आहे. आता याबद्दल विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता याच मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.

त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच मुंबईतील एक कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला. मी कार्यक्रमाची साईज बघत नाही. कामाची साईज बघतो. आयुष्यात चांगलं शिक्षण आणि शिक्षक मिळाले नाहीत तर काय होतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… असे जे काही दिवटे निघाले त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेलं…

तुमच्या आमदारकीचा फंड फक्त शिक्षणासाठी वापरा. विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार असेल तर त्यांच्या नाड्या आवळल्या जातात हे आपण वाचतो. आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवळण्याचा प्रकार सुरु झाला आहे. आजच तुम्ही पेपरमध्ये वाचलं असे तर त्यात लिहिलं आहे. बाबा मला मारतो म्हणून कोणीतरी दिल्लीत गेले होतं. ही लाचारी का आणि कशामुळे. जर त्यांना त्या वयात योग्य शिक्षण मिळालं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी

मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी टीका केली. गेले ३-४ वर्ष महापालिकेत बाप कोण आहे तेच कळत नाही. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे आहेत. सामान्य जनतेकडे कोण लक्ष देत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात आमदारकीचा निधी केवळ शिक्षणासाठी वापरण्याचे आवाहन आमदारांना केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...