पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय आजच; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

पुरामुळे हाहा:कार उडून आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सरकारी मदत कधी येईल याची पूरग्रस्तांना प्रतिक्षा आहे. (vijay wadettiwar)

पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय आजच; विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 3:09 PM

मुंबई: पुरामुळे हाहा:कार उडून आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सरकारी मदत कधी येईल याची पूरग्रस्तांना प्रतिक्षा आहे. मात्र, त्यांची ही प्रतिक्षा अवघ्या काही तासातच संपुष्टात येणार आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. (vijay wadettiwar reaction on relief package to flood affected people in maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्याआधीच विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आज होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होणार आहे. शंभर टक्के निर्णय होणार आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही अधिक मदत पूरग्रस्तांना दिली जाईल. या शिवाय छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दौरा करणं गैर नाही

विरोधी पक्ष नेत्यांनी पूर पाहणी दौरा करणं गैर नाही. पण त्याचवेळी निलंबित आमदारांसह काहीजण जातात आणि अधिकारी नाही म्हणून काहीजण कांगावा करतात हे चुकीचं आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.

लोकल प्रवासाची मुभा द्या

दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कॅबिनेट बैठकीआधीच मोठं विधान केलं आहे. ज्यांनी कोरोनाच्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, असं शेख यांनी म्हटलं आहे. मॉल आणि कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांनाही दोन डोस घेतले असतील तर प्रवासाची मुभा दिली पाहिजे, असं ते म्हणाले. केंद्र सरकारने दिलेली 700 कोटींची मदत ही मागील वर्षीच्या पुराची आहे. पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईच्या पॅकेजबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.

तातडीची मदत जाहीर

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. (vijay wadettiwar reaction on relief package to flood affected people in maharashtra)

संबंधित बातम्या:

दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू

Taliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन

भाजपचे खासदार, मंत्री गुरुवारी पंतप्रधानांना भेटणार, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी करणार

(vijay wadettiwar reaction on relief package to flood affected people in maharashtra)

Non Stop LIVE Update
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.