AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Weather Update : पालघरला रेड अलर्ट, औरंगाबाद, जळगावला यलो अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस?

आठवडाभराच्या तुफान बॅटिंगनंतर आज राज्यभरात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर निम्म्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाहीय.

Maharashtra Rain Weather Update : पालघरला रेड अलर्ट, औरंगाबाद, जळगावला यलो अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस?
Rain Update
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 09, 2021 | 4:07 PM
Share

मुंबई :  आठवडाभराच्या तुफान बॅटिंगनंतर आज राज्यभरात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात एकट्या पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यातल्या जवळपास 18 जिल्ह्यांत पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

पालघरला रेड अलर्ट, औरंगाबाद, जळगावला यलो अलर्ट

विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्याला पावसाचा आज कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. केवळ अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जळगाव, औरंगाबाद, जालन्याला देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

बाप्पाचं आगमन कोणत्याही विघ्नाशिवाय

राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाची तीव्रता, 9 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना कोणतीही अडचण नसेल. यंदाचं बाप्पाचं आगमन पावसाच्या विघ्नाशिवाय होईल.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

जळगाव औरंगाबाद जालना बुलडाणा अकोला

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

नंदूरबार धुळे नाशिक ठाणे पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग

अर्ध्या महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता नाही!

राज्यात गेले आठवडाभर तुफान पाऊस पडतोय. राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडतोय. मात्र आजपासून पावसाची तीव्रता कमी होतीय. त्यामुळे आज अर्ध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाहीय.

राज्यात पावसाचं धुमशान, राज्याच्या कापाकोपऱ्यात जोरदार पाऊस

राज्याला काल पावसाने झोडपून काढले. राजधानी मुंबईसह कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज अतिशय अचूक ठरला. धो धो पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय. महापुरातून सावरलेल्या चाळीसगावात पुन्हा जोरदार पावसाने नद्या नाल्यांना पूर आलाय. मुंबई, नागपूर, बुलडाणा, जामनेर, लातूर, नाशिक सगळीकडेच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.

राज्याच्या सर्वच विभागांत पाऊस धो धो बरसला. यामुळे कुठे पिकांना जीवदान मिळालं तर कुठे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालंय. कुठे रस्ते वाहून गेलेत, तर कुठे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय

(maharashtra mumbai rain weather update imd warning live update)

हे ही वाचा :

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धुमशान, मुंबई चिंब, विदर्भ मराठवाड्यात तुफान, चाळीसगावावर पुन्हा नद्या कोपल्या

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...