AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron : महाराष्ट्रावरील ओमिक्रॉनचं संकट वाढलं, 6 नव्या रुग्णांमुळं संख्या 54 वर,कोरोना संसर्गही वाढला

भारतातील ओमिक्रॉनचं (Omicron) संकट आता हळूहळू वाढत असल्याचं दिसतंय. देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे.

Omicron :  महाराष्ट्रावरील ओमिक्रॉनचं संकट वाढलं, 6 नव्या रुग्णांमुळं संख्या 54 वर,कोरोना संसर्गही वाढला
कोरोना विषाणू.
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 7:57 AM
Share

मुंबई: भारतातील ओमिक्रॉनचं (Omicron) संकट आता हळूहळू वाढत असल्याचं दिसतंय. देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 151 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन बाधितांची महाराष्ट्रातील (Maharashtra Corona Update) संख्या 54 वर तर नवी दिल्लीतील (New Delhi Corona Update) संख्या 22 झालीय. तर, आता कोरोना (Corona) बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. महाराष्ट्रात रविवारी 902 रुग्णांची नोंद झालीय. तर राजधानी नवी दिल्लीत देखील 107 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनसह कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढलीय.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनची संख्या 54 वर

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळला होता. त्यानंतर आता हळू हळू रुग्णसंख्या वाढू लागली आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ओमिक्रॉनचे सहा नवीन रुग्ण आढळून आले असून या रुग्णांची संख्या 54 झाली आहे. सहा रुग्णांपैकी एक रुग्ण मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि पिंपरी चिचवडचा आहे.

रविवारी 902 नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 902 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि 9 मृत्यू झाले आहेत. राज्यात दिवसभरात 767 कोरोनामुक्त झाले असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 7068 झाली आहे. तर, रविवारी दिवसभरात 201 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 300 च्या आसपास दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद होत होती. त्यानंतर ही संख्या कमी कमी होत होती. महिनाभर दररोज केवळ दोनशेच्या आत नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याचं पाहायला मिळतंय.

नवी दिल्लीत रविवारी कोरोनाचे 107 रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 22 वर

एकीकडे ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. नवी दिल्लीत तब्बल सहा महिन्यानंतर 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण एका दिवशी आढळून आले आहेत. रविवारी दिल्लीत 107 रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलं आहे. नवी दिल्लीत कोरोना विषाणू संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 540 वर पोहोचली आहे. यामधील 255 रुग्ण होम आयसोलेशेनमध्ये आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या

भारतातील दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये रविवारी 3297 रुग्ण आढळले आहेत. तर 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, देशातील कोरोनामुळं जीव गेलेल्यांची संख्या 4 लाख 77 हजार 422 वर पोहोचली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रावरील ओमिक्रॉनचं संकट वाढतंय, रुग्णसंख्या 54 वर

Girish Mahajan : खडसेंना 15 वर्ष लाल दिवा आणि 12 खाती मिळाली पण विकासकामं करण्यात अपयश, आता दुकानदारी बंद करावी: गिरीश महाजन

Maharashtra reports 902 and New Delhi reports 107 corona cases Omicron cases reach to 151 in India

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.