पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मोठ मोठे निर्णय (Exam cancels in Maharashtra ) घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असा (Exam cancels in Maharashtra ) आदेश दिला. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.  तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर होतील. असं असलं तरी दहावीच्या परीक्षा मात्र नियमित वेळापत्रकाप्रमाणेच होतील. 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.

दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.

कोणकोणत्या परीक्षा रद्द?

  • पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
  • नववी ते अकरावी  – 15 एप्रिलनंतर परीक्षा
  • दहावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील.
  • पेपर तपासणी 31 मार्चपर्यंत सध्या तरी थांबवण्यात येईल
  • पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गुण संकलन करुन निकाल दिला जाईल
  • शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम (दहावी वगळून)

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Mumbai Local) यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं (Uddhav Thackeray Mumbai Local . मुंबईतील लोकल आणि बस सुरुच राहणार आहेत. मात्र मुंबई, MMRD, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं, सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.  ज्यांना शक्य त्यांनी घरातून काम करा, शक्य नसेल ती कार्यलये बंद करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या 

CM LIVE | मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील दुकानं, कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद  

मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय बंद राहणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI