AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभ्यास दौऱ्यासाठी 21 अधिकारी अमेरिकेत, दौरा संपला, मात्र सुट्टी वाढवून तिथेच राहिले!

मुंबई: अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलेले राज्याचे बडे 21 अधिकारी दौरा संपला तरी परतायचं नाव घेत नाहीत. दौरा संपून 10 दिवस झाले तरी हे अधिकारी अद्याप परतलेच नाहीत. या अधिकाऱ्यांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. अमेरिकेतील गृहनिर्माण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी 21 अधिकारी 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळासाठी अधिकृत अभ्यास दौऱ्यावर गेले. मात्र […]

अभ्यास दौऱ्यासाठी 21 अधिकारी अमेरिकेत, दौरा संपला, मात्र सुट्टी वाढवून तिथेच राहिले!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

मुंबई: अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलेले राज्याचे बडे 21 अधिकारी दौरा संपला तरी परतायचं नाव घेत नाहीत. दौरा संपून 10 दिवस झाले तरी हे अधिकारी अद्याप परतलेच नाहीत. या अधिकाऱ्यांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

अमेरिकेतील गृहनिर्माण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी 21 अधिकारी 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळासाठी अधिकृत अभ्यास दौऱ्यावर गेले. मात्र हा दौरा संपून 10 दिवस होत आले तरी हे अधिकारी परतलेच नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या अधिकाऱ्यांनी रजा टाकून अमेरिकेत थांबण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. अधिकृत दौरा वाढवला नाही, तरी सुट्टी टाकून हे अधिकारी अमेरिकेत थांबले आहेत. या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर महानगरपालिका आयुक्तांचा समावेश आहे. तसंच काही अधिकारी आणि बाकी सर्व एसआरए आणि गृहनिर्माण विभागाचे अधिकारी आहेत.

अभ्यास दौरा संपला तरी अधिकारी अमेरिकेत रमल्याचं चित्र आहे. भलेही या अधिकाऱ्यांनी सुट्टी किंवा रजा टाकली असली, तरी अभ्यास दौऱ्यानिमित्त ते अमेरिकेत गेल्याचं विसरले की काय असा प्रश्न आहे.

दौरा नेमका कशासाठी?

पंतप्रधान आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी योजना आहे. प्रत्येकाला घर हे मोदी सरकारचं स्वप्न आहे. गेल्या 60 वर्षात घरं बांधली नाहीत इतकी घरं पाच वर्षात बांधण्याचा संकल्प मोदी सरकारचा आहे. हेच काम प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अधिकाऱ्यांना अभ्यासासाठी अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. यापैकी 21 अधिकाऱ्यांची पहिली तुकडी गेल्या वर्षी 15 एप्रिल ते 28 एप्रिल 2018 दरम्यान पाठवण्यात आली होती. परवडणारी घरं बांधण्याचं नवं तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने या दौऱ्याचं नियोजन केलं. मात्र त्या दौऱ्यात गेलेल्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं याचा पत्ता नसताना सरकारने दुसरी तुकडी पाठवली.

सध्या दौऱ्यावर गेलेल्या अधिकाऱ्यांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. ही 22 अधिकाऱ्यांची यादी आहे, त्यापैकी एका अधिकाऱ्याला व्हिसा अभावी जाता आलं नाही.

दौऱ्यावर गेलेले अधिकारी

वीरेंद्र सिंह, IAS

आयुक्त, नागपूर महापालिका

संदीप जगन्नाथ देशमुख, अप्पर निबंधक, सहकारी संस्था प्रतिनियुक्तीने सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

डॉ. सुनिल लहाने, उपसंचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी

अभिजीत बापट, मुख्याधिकारी, पंढरपूर नगरपरिषद

श्रीनिवास भगवान मोकलीकर, अवर सचिव, गृहनिर्माण विभाग

प्रशांत पुरसिंग राठोड, कक्ष अधिकारी, गृहनिर्माण विभाग

मिलिंद कुलकर्णी, अवर सचिव प्रतिनियुक्तीने उपमुख्य अधिकारी, मुंबई, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

प्रसांत पागृत, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर

रामा मिटकर, उपमुख्य अभियंता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

पी. पी. महिषी, कार्यकारी अभियंता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

दिनेश एस. श्रेष्ठ, कार्यकारी अभियंता, नाशिक मंडळ

भूषण देसाई, कार्यकारी अभियंता, मुंबई मंडळ

भूषण कोल्हे, उपअभियंता, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

आशिष चौधरी, उपअभियंता, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

जया चव्हाण, उपअभियंता, बीडीडी कक्ष/मुंबई मंडळ

राजश्री जोशी, सहा. वास्तुशास्त्रज्ञ, मुंबई मंडळ

रेखा बोराडे, उपअभियंता, मुंबई मंडळ

स्मिता मोरे, सहाय्यक अभियंता, पीएमएवाय/प्राधिकरण

पी. बी. फुलपगारे, सहाय्यक अभियंत, पीएमएवाय/प्राधिकरण

अमोल चौधरी, सहाय्यक अभियंता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

शंकर वीरकर, कनिष्ठ अभियंता, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

विक्रम निंबाळकर, सहाय्यक अभियंता, मुंबई मंडळ

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....