सरकारवर टीका केल्यानं नक्षली ठरवणारे साहित्य परंपरेवरील काळिमा : प्रज्ञा पवार

गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना गुजरात साहित्य परिषदेने नक्षली साहित्यिक असल्याचा आरोप केला. यानंतर महाराष्ट्रातील साहित्य विश्वातून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय.

सरकारवर टीका केल्यानं नक्षली ठरवणारे साहित्य परंपरेवरील काळिमा : प्रज्ञा पवार
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 1:49 AM

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदीत वाहणार्या प्रेतांवर आपल्या कवितेतून भाष्य करणाऱ्या गुजराती कवयित्री पारुल खक्कर यांना गुजरात साहित्य परिषदेने नक्षली साहित्यिक असल्याचा आरोप केला. यानंतर महाराष्ट्रातील साहित्य विश्वातून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय. ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री प्रज्ञा दया पवार आणि कवी संतोष पवार यांनी पारुल यांच्यावरील या टीकेचा आणि आरोपांचा निषेध करत असे आरोप करणाऱ्या गुजरात साहित्य परिषदेवर हल्लाबोल केलाय (Maharashtrian Literary hit back to Gujrat Sahitya Akademi over Naxal remark).

“ही कविता आत्यंतिक सश्रद्ध स्त्रीची अगदी आतून आलेली सच्ची भावना”

ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री प्रज्ञा पवार या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, “मुळात पारुल यांनी त्यांच्या कवितेत माँ गंगा प्रेताने भरुभरुन वाहतेय याविषयी तीव्र विलाप व्यक्त केला आहे. ही कविता एका आत्यंतिक सश्रद्ध अशा स्त्रीची अगदी आतून आलेली सच्ची भावना आहे. आजपर्यंत श्रद्धेपोटी धार्मिक भजने लिहिणाऱ्या पारुलताई गंगेच्या या अपरुपाने अक्षरशः विद्ध झाल्या आहेत. ही कविता वाचताना त्यातल्या आक्रोशाने, वैयर्थतेने, राजा नग्न असल्याच्या आणि रंगाबिल्लाच्या धीट उल्लेखाने, त्यातल्या प्रखरतेने, तीव्र उपहासाने आपल्याला हलवून सोडते. खरं तर या कवयित्रीने आपल्यासमोर आरसा ठेवलाय. त्यात दिसणारी प्रतिमा प्रधानसेवकांना आणि त्यांच्या परममित्राला रुचणारी नाही हे तर उघडच आहे.”

“पांड्यासारखे सरकारी लेखनकामाठी गुजराती साहित्य परंपरेला काळिमा”

“करोना महामारीतल्या नियोजनाचा गलथानपणा, ढिसाळपणा, कोलमडून पडलेलं व्यवस्थापन, लाखो लोकांच्या मृत्यूची झाकपाक आणि अवघ्या देशाला आलेली स्मशानवत अवकळा, पैशांअभावी गंगेत सोडावी लागणारी प्रेतं, एखाद्या टिपकागदासारखा हा अवघा कल्लोळ टिपून घेणारी संवेदनशीलता आता अराज्यवादी, नक्षलवादी ठरवली गेली आहे. प्रधानसेवकाचे इमानी कुत्रे बनून स्वतःची जागा सेफ करणारे हे पांड्यासारखे सरकारी लेखनकामाठी करणारे म्हणजे अवघ्या गुजराती साहित्याच्या समृद्ध परंपरेला काळिमा फासणारे आहेत,” असा हल्लाबोल प्रज्ञा पवार यांनी केला.

“2002 मध्ये जेव्हा रातोरात वली दखनीची कबर भुईसपाट केली गेली आणि त्यावर गुळगुळीत डांबरी सडक बनवली गेली तेव्हा त्याची पाठराखण करणारे हेच साहित्यिक होते. एका अर्थाने या सरकारधार्जिण्या साहित्य व्यवहारावर पारुल खक्कर यांनी खणखणीत चपराक लगावली आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पाळीव साहित्यिक त्यांच्यावर आगपाखड करत आहेत. मी पारुल यांच्या निर्भयी अभिव्यक्तीला सलाम करते आणि त्यांना नक्षलवादी ठरवणाऱ्यांचा तीव्र निषेध करते. ‘वैष्णव जन तो तेने कहिये जे, पीड पराई जाणे रे’ म्हणणाऱ्या गुजरातच्या भूमीतला आजचा धीट, खणखणीत आवाज पारुल खक्करच्या रुपाने असाच गुंजत राहो,” असंही मत प्रज्ञा पवार यांनी व्यक्त केलं.

“पारुल यांच्या कवितेवर प्रश्न उपस्थित करणं बालिशपणा”

महाराष्ट्रातील कवी संतोष पवार यांनी गुजरात साहित्य अकादमीच्या या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय. ते म्हणाले, “गुजरात साहित्य अकादमीच्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकामध्ये अकादमीचे अध्यक्ष विष्णु पांड्या यांनी संपादकीयमध्ये पारुल खक्कर या कवयित्रीला नक्षलवादी, अराजकतावादी ठरवलं आहे. ‘त्या ‘ कवितेला – कवितेचं ‘राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा’ हे शीर्षक मात्र त्यातून पूर्णपणे वगळून टाकले आहे. ही कविता तरी आहे का असा बालिश प्रश्न तिथे उपस्थित केला आहे.”

“परिषदेच्या अध्यक्षांकडून आधी उगवत्या ताऱ्याची उपमा, आता त्याच ताऱ्यावर थुंकण्याचा प्रकार”

“खरा लिहिता लेखक हा सत्याचीच बाजू घेतो. उन्मादात बुडालेल्या गुजरातमधून आलेला पारूल यांचा आवाज खतरनाक होता. आता तो तिथल्या मोदी शहा या रंगा-बिल्ला चमचांना बोचतो आहे. अकादमीचे अध्यक्ष दुतोंडी असून त्यांचा जाहीर निषेध आहे. याच अध्यक्ष पांड्या यांनी पारूल या गुजरात साहित्याचा उगवता तारा आहे म्हटले होते. तो उगवला तर हे त्या ताऱ्यावर थुंकायला निघाले आहेत. अखिल भारतातील लेखक पारूल यांच्या पाठीशी उभे राहतील. पारूल यांना गुजरातमध्ये काही अडचण असेल तर त्यांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करण्याची मोहीम राबविण्यात येईल,” असंही मत संतोष पवार यांनी व्यक्त केलं.

‘शववाहिनी बनली गंगा!’ या कवितेवरुन वाद

एका सूरात बोलले मुडदे,
छान छान सारं काही,
नाही कुठेही दंगा
राजा,तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
राजा,तुझी स्मशाने संपली
सरपणदेखील संपले रे
खांदे आमचे कमी पडती
कमी पडती रे रडणारे
घरोघरी यमाच्या टोळीचा
सुरूयं अवघा नाच नंगा
राजा, तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
नित्य निरंतर चिता जळती
जरा क्षणाची उसंत मागती
नित्य निरंतर फुटे बांगडी
धडधडीने फुटली छाती
ज्वाळा उंच उंच पाहताना
फिडल वाजवती बिल्ला रंगा
राजा,तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
दिव्य तुझी वस्त्रप्रावरणे
दिव्य तुझी रे कांती
कळले तुझे रूप खरे
जनता आहे जाणती
तू तर धोंडा,नाही मोती
आहे कुणी का मर्दगडी
जो म्हणू शकेल,
माझा राजा नंगा
राजा, तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
कवयित्री – पारुल खक्कर
मराठी अनुवाद – भरत यादव

हेही वाचा :

PHOTOS : उत्तर प्रदेशमधील हादरवून टाकणारी दृश्यं, मृतदेहांचा खच पाहून प्रत्येकजण सुन्न

सरकारच्या इशाऱ्यानंतरही गंगेच्या तीरावर मृतदेहांचं दफन सुरूच, प्रेतांची मोजदादही अशक्य

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नायजेरियाचे; कंगना रनौतचा जावईशोध

व्हिडीओ पाहा :

Maharashtrian Literary hit back to Gujrat Sahitya Akademi over Naxal remark

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.