AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेवर आघाडीचेच उमेदवार विजयी होणार; विधानपरिषदेवरही तेच चित्र दिसणार; छगन भुजबळ यांचा विश्वास

राज्यसभा असो वा विधानपरिषद असो यामधील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील अशी खात्रीही छगन भुजबळ यांनी यावेळी बोलून दाखवली.

राज्यसभेवर आघाडीचेच उमेदवार विजयी होणार; विधानपरिषदेवरही तेच चित्र दिसणार; छगन भुजबळ यांचा विश्वास
राज्यसभेवर आघाडीचेच उमेदवार विजयी निवडून येणार; विधानपरिषदेवरही तेच चित्र दिसणार; छगन भुजबळ यांचा विश्वासImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2022 | 3:12 PM
Share

मुंबईः भाजपने राज्यसभा निवडणूकीत (Rajysabha Elecation) जास्त उमेदवार दिला, मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही (Vidhanparishad Elecation) तयारी करावी लागेल, त्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi Candidate) राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

राज्यसभा असो वा विधानपरिषद असो यामधील घोडेबाजाराला कोण बळी पडणार नाही. आमचे सर्व आमदार प्रामाणिक राहतील अशी खात्रीही छगन भुजबळ यांनी यावेळी बोलून दाखवली.

पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले

यावेळी त्यांनी सांगितले की, पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते, त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करेन परंतु त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झाले होते. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर आणि समाजावरही होत असतो असे सूचक विधानही छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

अपमानकारक बोललं जाऊ नये

कुठल्याही धर्मगुरूविरुध्द बोललं जाऊ नये, अपमानकारक बोललं जाऊ नये, प्रत्येक धर्माचा आदर राखला गेला पाहिजे. हे आपल्या संविधानात लिहिले आहे. आता जे कुणी धमक्या देत आहेत त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, हे भारताने केलेले नाही. हे भारतातील एका पक्षाच्या कार्यकर्त्यांने केले आहे. त्याची सजा इतर भारतीयांना नको. एखाद्या पक्षात असे माथेफिरू लोक असतात केवळ प्रसिद्धी मिळावी त्यासाठी काहीजण करत असतात. तो म्हणजे भारत नव्हे. त्या एका पक्षाच्या लहान प्रवक्ता आहेत. त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. त्यामुळे अरब इस्लामिक देशातील लोक सहकार्य करतील असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठी शिकायला कृपाशंकर सिंग यांना सांगा

कृपाशंकर सिंग यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जावा असे म्हटले आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सगळ्यांनी सर्व भाषा शिकाव्यात विशेष करुन मुंबईत… उत्तरभारतीय लोक मुंबईत मोठ्याप्रमाणावर आहेत त्यांना मराठी शिकायला कृपाशंकर सिंग यांनी सांगावे असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.