मोठी बातमी: 27 जानेवारीला बेळगाव सीमाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक

कर्नाटकात भाजपचे सरकार असल्यामुळे आता भाजप सीमाप्रश्नावर काय भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. | karnataka belgaum issue

मोठी बातमी: 27 जानेवारीला बेळगाव सीमाप्रश्नी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक
sharad pawar-uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 2:51 PM

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka border issue) तोडगा काढण्यासाठी महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच काहीतरी मोठ्या हालचाली होण्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात 27 जानेवारीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ हे नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनीही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. (Mahavikas Aghadi govt hold important meeting on 27 January about karnataka belgaum border issue)

मात्र, कर्नाटकात भाजपचे सरकार असल्यामुळे आता भाजप सीमाप्रश्नावर काय भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बेळगावात भगवा फडकवण्यावर शिवसैनिक ठाम, सीमेवर कर्नाटक पोलिसांसोबत झटापट

बेळगावातील हुतात्मा दिनापासून सीमाप्रश्नावरुन राजकीय वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हुतात्मा दिनी बेळगावात जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्नाटक पोलिसांनी त्यांना कोगनेळी टोलनाक्यावर रोखले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी बेळगावात कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकावण्याचा निर्धार केला होता. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटावावा, अशी मागणी या शिवसैनिकांनी केली होती. त्यासाठी गुरुवारी शिवसैनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिनोळी गावात पोहोचले होते.

यावेळी कर्नाटक पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. आता शिवसैनिकांनी गनिमी काव्याने बेळगावात शिरण्याचा चंग बांधला आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

बेळगाव सीमाप्रश्नावर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि येडीयुरप्पांची शिखर परिषद व्हावी : संजय राऊत

अमित शाहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार

(Mahavikas Aghadi govt hold important meeting on 27 January about karnataka belgaum border issue)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.