VIDEO: मुंबईच्या जेव्हीएलआर रोडवर भीषण अपघात; भरधाव वेगातील डंपरनं दुचाकीस्वाराला उडवलं

Accident | चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. डंपरची धडक बसल्यानंतर दुचाकी जवळच उभ्या असणाऱ्या बेस्टच्या बसवर जाऊन आदळली.

VIDEO: मुंबईच्या जेव्हीएलआर रोडवर भीषण अपघात; भरधाव वेगातील डंपरनं दुचाकीस्वाराला उडवलं
मुंबईत भीषण अपघात


मुंबई: उपनगरातील जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर नुकताच एक भीषण अपघात झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज अक्षरश: अंगाचा थरकाप उडवणार आहे. जेव्हीएलआर मार्गावरील दुर्गा नगर जंक्शन या ठिकाणी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. डंपरची धडक बसल्यानंतर दुचाकी जवळच उभ्या असणाऱ्या बेस्टच्या बसवर जाऊन आदळली.

या अपघातात दुचाकीवरील दोघेजण आणि बेस्ट चालक जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी धाव घेऊन गुन्हा नोंद केला. सध्या पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत असून डंपर चालकाचा शोध घेतला जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI