Mumbai Traffic Police Advisory: गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडताय? मग अडकलेच समजा, मराठा मोर्चाने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प

maratha morcha traffic in mumbai : आझाद मैदानापासून ते पार मुंबईच्या वेशीपर्यंत मराठ्यांचं भगव वादळ दिसत आहे. त्यामुळे गणेश भक्तांची मोठी पंचाईत झाली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत असाल तर मुंबई पोलिसांची ही ट्रॅफिक ॲडव्हायझरीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

Mumbai Traffic Police Advisory: गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडताय? मग अडकलेच समजा, मराठा मोर्चाने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प
गणेशभक्तांसाठी मोठी सूचना
| Updated on: Aug 29, 2025 | 9:42 AM

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठ्यांची त्सुनामी अरब महासागराजवळ जमा होत आहे. रात्रीच जरांगे पाटील मुंबईत धडकले. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव हे आझाद मैदानाकडे निघाले आहेत. सध्या त्यांचा ताफा कोळीवाड्याच्या पुढे आहे. जवळपास साडेसहा हजाराहून अधिक वाहनं मुंबईत दाखल झाली आहेत. तर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाची सूचना देण्यात आली आहे. खास करुन गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई पोलिसांची ही ट्रॅफिक ॲडव्हायझरी डोळ्याखालून जरूर घालावी.

या गोष्टी माहिती असायलाच हव्यात

  1. अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होत आहेत
  2. प्रशासनानुसार, आझाद मैदानात 20 हजारांच्या घरात आंदोलक असतील
  3. या मैदानाची क्षमता अवघी 5 हजार इतकीच आहे
  4. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि सायन-पनवेल हायवेवर मराठा आंदोलकांची वाहनं आहेत
  5. मुंबईतील महत्त्वाचे मार्ग ईस्टर्न फ्रीवे,सायन-पनवेल हायवे, पनवेल-सायन महामार्ग, व्ही. एन पुर्व मार्ग, पी डी मेलो रस्ता, वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. दादाभाई नैरोजी मार्ग आणि हजारीमल सोमानी रस्ता हे सर्व मार्ग बंद असतील. केवळ अत्यावश्यक मार्गासाठी या मार्गांचा वापर करता येईल.
  6. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी योग्य मार्गाचाच वापर करावा

हे मार्ग बंद

  • वाशी ते पांजरपोळ फ्री वे व्हाया साऊथ बाँड
  • सायन पनवेल ते पांजरपोळ मार्ग
  • सी. जी. गिडवाणी पांजप पोळकडे व्हाया उत्तर मार्ग
  • आय. ओ.सी. जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजवरील फ्री वे
  • देवनार फार्म ते पांजर पोळकडील मार्ग


लोकलवर पण परिणाम

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल होत आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक आंदोलन मुंबईकडे येत आहेत. काही आंदोलक रेल्वेने दाखल होत आहेत. हे आंदोलक हजारोच्या संख्येने असतील. हे आंदोलक सीएसटीकडे धावणाऱ्या लोकलमधून प्रवास करतील. त्यामुळे लोकलवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आझाद मैदान परिसर ते दादरपर्यंतच्या परिसरावर परिणाम

आंदोलक हे मोठ्या संख्येने वाहनांनी मुंबईत दाखल होत आहे. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी उसळली आहे. अजून मोठ्या संख्येने गर्दी लोटण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी मराठा समाजाचे वादळ हे मुंबईच्या वेशीवर, वाशीत थांबवण्यात सरकारला यश आले होते. पण यावेळी थेट मुख्य मुंबईत मराठा समाजाची लाट आली आहे. त्याचा अर्थातच केवळ आझाद मैदान परिसरावर ताण येणार नाही तर दादरपर्यंतच्या परिसरापर्यंत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांची यामुळे तारेवरची कसरत होत आहे.