AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansukh Hiren Death case : NIA चं पथक पोलीस आयुक्तांना भेटलं, तर सचिन वाझे तिसऱ्यांदा CP ऑफिसमध्ये

NIAच्या टीमनं आज पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ते पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आज पुन्हा एकदा पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात दाखल झालेले पाहायला मिळाले.

Mansukh Hiren Death case : NIA चं पथक पोलीस आयुक्तांना भेटलं, तर सचिन वाझे तिसऱ्यांदा CP ऑफिसमध्ये
सचिन वाझे यांना पुन्हा प्रकाशझोतात यायचे होते. ख्वाजा युनूस प्रकरणामुळे पोलीस दलात गेलेली आपली पत पुन्हा मिळवायची होती.
| Updated on: Mar 09, 2021 | 8:33 PM
Share

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकानं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAच्या टीमनं आज पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने ज्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ते पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आज पुन्हा एकदा पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात दाखल झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरण आता वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(NIA team visits CP in case of car full of explosives found near Mukesh Ambani’s house)

NIAची टीम आयुक्तांच्या भेटीला

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकानं भरलेली गाडी सापडल्याचा तपास NIAनं आपल्याकडे घेतला आहे. या प्रकरणात आज NIA च्या टीमनं पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनची भेट घेतली. या टीममध्ये IG दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या टीमने सुरुवातीला पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचीही त्यांनी भेट घेतली. NIA च्या टीममधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या तपासाची सर्व कागदपत्रे आणि विविध मुद्दे पोलीसांकडून मागण्यात आली आहेत. ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. तसंच NIA मुंबईत कधीही आपल्या तपासाला सुरुवात करु शकतं, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

सचिन वाझे दुसऱ्यांदा CP ऑफिसमध्ये

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केल्यानंतर सचिन वाझे आज तिसऱ्यांना पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं कळतंय. या भेटीनंतर ते बाहेर पडले असता त्यांनी माध्यमांनी काही प्रश्न विचारले. त्यात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं असता, गाडी माझ्याकडे होती किंवा नव्हती यात आरोप काय आहे? असा सवाल त्यांनी केला. तसंच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोप आपण वाचून त्यावर प्रतिक्रिया देऊ, असंही वाझे यांनी म्हटलंय.

ATS ची टीम दुसऱ्यांदा मुंब्रा रेतीबंदर खाडीवर

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास ATS करत आहे. त्यासंदर्भात मनसुख हिरेन यांचा मृतदेह त्या ठिकाणी सापडला होता त्या मुंब्रा रेतीबंदर खाडीवर ATSची टीम आज दुसऱ्यांदा पोहोचली. त्यावेळी त्यांनी फक्त घटनास्थळाची पाहणी केल्याची माहिती मिळतेय. यावेळी त्यांनी कुणाशीही चर्चा केली नाही. दरम्यान, ATS कडून या घटनेचं रिक्रिएशन आज केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ATSकडून कुठल्याही प्रकारचं रिक्रिएशन आज करण्यात आलेलं नाही.

संबंधित बातम्या :

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

Mansukh Hiren death : होय मी CDR मिळवला, माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचं ओपन चॅलेंज

NIA team visits CP in case of car full of explosives found near Mukesh Ambani’s house

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.