Mansukh Hiren death : होय मी CDR मिळवला, माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचं ओपन चॅलेंज

उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा. | Devendra Fadnavis Mansukh Hiren death

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:41 PM, 9 Mar 2021
Mansukh Hiren death : होय मी CDR मिळवला, माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचं ओपन चॅलेंज
सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले.

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख  (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी महाविकासआघाडीची कोंडी झाली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी सभागृहात हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांच्या तक्रारीची प्रत आणि कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या (CDR) आधारे या प्रकरणातील तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. (Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt over Mansukh Hiren death case)

उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. तेव्हा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

नाना पटोले यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस ताडकन उभे राहिले आणि सरकारने माझी चौकशी करावीच, असे खुले आव्हान दिले. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा. पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का? सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ललकारले.

सचिन वाझेंना गृहमंत्री पाठिशी घालतायत: फडणवीस

सचिन वाझे हा एका पक्षाशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री त्याला पाठिशी घालत आहेत. केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे म्हणून अपराध्याला पाठिशी घालणे योग्य नव्हे. सचिन वाझे यांना आत्ताच्या आत्ता निलंबित करा आणि अटक करा, अशी आग्रही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

‘त्यांना वाटलं खाडीला भरती आहे मनुसख हिरेनची बॉडी कधी सापडणारच नाही, पण…’

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

(Devendra Fadnavis slams Mahavikas Aghadi govt over Mansukh Hiren death case)