AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 रेषा म्हणजे इतके रुपये…; मंत्रालयात पैसे खाण्याची सिक्रेट भाषा काय? वाचून बसेल धक्का

मंत्रालयातील एफडीए विभागात परवाने बहाल करण्यासाठी 'कोडिंग'च्या माध्यमातून लाच घेतली जात असल्याचा सविस्तर खुलासा झाला आहे. या रॅकेटमध्ये मंत्र्यांचे पीए आणि काही कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

1 रेषा म्हणजे इतके रुपये...; मंत्रालयात पैसे खाण्याची सिक्रेट भाषा काय? वाचून बसेल धक्का
mantralaya code
| Updated on: Feb 20, 2026 | 10:49 AM
Share

महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मुंबईतील मंत्रालयाबद्दल सध्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्यातच आता मंत्रालयातीली भ्रष्टाचाराची एक धक्कादायक आणि तितकीच चित्रविचित्र पद्धत समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात चक्क कोडिंगच्या भाषेत लाच मागितली जात असल्याचे समोर आली आहे. एका स्टिंग ऑपरेशनद्वारे याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये मंत्र्यांचे पीए आणि काही कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे यांच्यावर मेडिकल दुकानदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप एका स्टिंग ऑपरेशनद्वारे करण्यात आला आहे. औषध विक्रेत्यांच्या परवान्यांच्या संदर्भात हा सर्व प्रकार घडला आहे. एफडीएचे ड्रग्ज इन्स्पेक्टर जेव्हा एखाद्या मेडिकल दुकानात त्रुटी काढतात, तेव्हा त्या दुकानदाराचा परवाना निलंबित केला जातो. या निलंबनावर अपील करण्याचा अधिकार मंत्र्यांकडे असतो. पण त्या दुकानदाराने केलेल्या आरोपानुसार हे अपील खुद्द मंत्री ऐकण्याऐवजी त्यांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क डेरिंगे हेच ऐकत होते.

तक्रारदार मेडिकल चालकाने दिलेल्या पुराव्यांनुसार, मंत्रालयात पैसे मागण्यासाठी शब्दांचा वापर टाळून सांकेतिक खुणांचा वापर केला जात होता.

  • एक उभी रेषा (|): याचा अर्थ ५० हजार रुपये लाच
  • दोन उभ्या रेषा (||): याचा अर्थ १ लाख रुपये लाच
  • तीन उभ्या रेषा (|||): याचा अर्थ दीड लाख रुपये लाच

या फाईलवरील स्टिकी नोट्सवर या रेषा मारल्या जायच्या. त्यानंतर राजू नावाच्या एका व्यक्तीला बोलावून त्या दुकानदाराला बाहेर नेले जायचे. त्यानंतर पैशांचा व्यवहार पूर्ण केला जाई. पैसे मिळाल्यावरच परवाना पुन्हा बहाल करण्याचा निर्णय दिला जात असे, असे स्टिंगमधून समोर आले आहे.

माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार

या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला या प्रकरणाची कोणतीही पूर्वकल्पना नाही. माझ्या नावाचा वापर करून कोणी गैरप्रकार करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. जर माझ्या कार्यालयातील कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी दोषी आढळला, तर मी तात्काळ माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे, असे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटले.

लाईन गेमची चौकशी करण्याची शक्यता

या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली आहे. मंत्रालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, वसुलीसाठी नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान गृह विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) देखील या संशयास्पद लाईन गेमची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...