AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Gunaratna Sadavarte यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड; मराठा तरुणांचा सर्वात मोठा दणका

मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. शांततेच्या मार्गानेच हा लढा जिंकायचं असल्याचं जरांगे यांचं म्हणणं आहे. मात्र मराठा तरुण प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे. या तरुणांनी आज थेट प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनाच दणका दिलाय.

Video : Gunaratna Sadavarte यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड; मराठा तरुणांचा सर्वात मोठा दणका
gunaratna sadavarteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2023 | 8:18 AM
Share

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : आरक्षणासाठी आम्ही शांततेचं आंदोलन करत आहोत. कुणीही उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ, तोडफोड करू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहेत. मराठा तरुणांना संयम आणि सबुरीचा सल्ला जरांगे पाटील देत आहेत. मात्र, आता मराठा तरुणांचा आरक्षणासाठीचा संयम सुटलेला पाहायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनाच दणका दिला आहे. या तरुणांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली आहे.

मराठा तरूणांनी आज सकाळीच गुणरत्न सदावर्ते यांच्या घराकडे जाऊन ही तोडफोड केली. गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवर येथे राहतात. क्रिस्टल टॉवरच्या पार्किंगमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे. हे तीन तरुण हातात काठ्या घेऊन आले आणि त्यांनी अंदाधूंदपणे सदावर्ते यांच्या दोन गाड्यांच्या काचा फोडल्या. अत्यंत आक्रमक होत या तरुणांनी सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या तरुणांनी पार्किंगमधील इतर वाहनांना हात लावला नाही. फक्त सदावर्ते यांच्याच दोन्ही वाहनांची तोडफोड केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या.

पोलिसांकडून अटक

एकूण तीन तरुण क्रिस्टल टॉवर येथे आले होते. या तिन्ही तरुणांच्या हातात काठ्या होत्या. त्यातील एक तरुण गेवराईचा सरपंच असून त्याचं नाव मंगेश साबळे असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणांनी जोरजोरात घोषणा देत वाहनांची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी या तिन्ही तरुणांना अटकाव करत त्यांना अटक केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून त्यातून वाहनांची प्रचंड तोडफोड झाल्याचं दिसून येत आहे.

सदावर्ते यांच्यावरील रागातून हल्ला

गुणरत्न सदावर्ते यांनी नेहमीच मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिकाही कोर्टात दाखल केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील सभेलाही विरोध केला होता. जरांगे पाटील यांच्या सभेत राडा होणार असून जरांगे यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केली होती. त्यामुळे जरांगे पाटील यांनी प्रत्येक सभेतून सदावर्ते यांच्यावर टीका केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी आपला राग व्यक्त करत सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!