‘पवार साहेब, इकडे लक्ष द्या’; मराठा क्रांती मोर्चाचे आझाद मैदानात बॅनर्स!

मुंबईतल्या आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भेट देणार आहेत. (maratha kranti thok morcha protest in azad maidan, mumbai)

'पवार साहेब, इकडे लक्ष द्या'; मराठा क्रांती मोर्चाचे आझाद मैदानात बॅनर्स!
मराठा क्रांती ठोक मोर्चा

मुंबई: मुंबईतल्या आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भेट देणार आहेत. पवार आझाद मैदानात येत असल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. पवारांनी आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं म्हणून मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, असा मजकूर लिहिलेले पोस्टर आणि बॅनर्स आझाद मैदानात झळकवले आहेत. (maratha kranti thok morcha protest in azad maidan, mumbai)

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षण, नोकर भरती, नोकर भरतीतील नियुक्त्या आदी विविध मुद्द्यांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. काल रविवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. आजही मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. याच वेळी आझाद मैदानात दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज आझाद मैदानात येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांकडेही पवारांचं लक्ष वेधावं म्हणून मराठा आंदोलकांनी ‘पवार साहेब, इकडेही लक्ष द्या’, असा मजकूर लिहिलेले बॅनर्स आझाद मैदानात झळकवले आहेत.

मोर्चेकऱ्यांना अडवले

मराठा आंदोलक आज दुपारी हे बॅनर्स घेऊन शेतकरी मोर्चाच्या दिशेने घोषणा देत निघाले होते. पवारांनी आपल्या मागण्यांकडेही लक्ष द्यावे या हेतूने ते शेतकरी मोर्चाकडे निघाले होते. मात्र, शेतकरी मोर्चात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना मध्येच आडवले. त्यामुळे या मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनस्थळी थांबून जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले होते

काल शनिवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला होता. (maratha kranti thok morcha protest in azad maidan, mumbai)

मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल असं सरकारला वाटत असावं. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. (maratha kranti thok morcha protest in azad maidan, mumbai)

संबंधित बातम्या:

… तर मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसू; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

गायकवाड कमिशन देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं फिक्सिंग; शेंडगेंचा आरोप

तरीही काही लोक आमच्यात अतिक्रमण करतायत: विजय वडेट्टीवार

‘… तर OBC कोट्यातून मराठा आरक्षण द्यावं’, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ‘या’ 11 मोठ्या मागण्या

(maratha kranti thok morcha protest in azad maidan, mumbai)

Published On - 12:55 pm, Mon, 25 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI