गायकवाड कमिशन देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं फिक्सिंग; शेंडगेंचा आरोप

मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या एम. जी. गायकवाड कमिशनला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी विरोध केला आहे. (prakash shendge oppose gaikwad Commission Report)

गायकवाड कमिशन देशाच्या इतिहासातील सगळ्यात मोठं फिक्सिंग; शेंडगेंचा आरोप
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 12:35 PM

मुंबई: मराठा समाजाचं मागासलेपण ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या एम. जी. गायकवाड कमिशनला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी विरोध केला आहे. गायकवाड कमिशन देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं फिक्सिंग असल्याचा आरोप प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केला आहे. (prakash shendge oppose gaikwad Commission Report)

प्रकाश शेंडगे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गायकवाड कमिशन हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं फिक्सिंग असून गायकवाड कमिशनच्या अहवालाला आमचा विरोध आहे. या अहवालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, असं शेंडगे यांनी सांगितलं.

मराठा समाजाचा एबीसीत समावेश करण्यास आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाला भटक्या विमुक्त समाजाचा टोकाचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाचे नेते राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत. तशी वक्तव्यही मराठा नेत्यांकडून होत आहेत. ओबीसी समाज हे कदापिही सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तर डबल मोर्चे काढू

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची सकल मराठा समाजाची मागणी आहे. मात्र, काही मराठा नेते ओबीसी आरक्षणाला धक्का लावू पाहत आहेत. त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. त्यासाठी डबल मोर्चे काढू, असा इशाराही त्यांनी दिला.

काय आहे गायकवाड कमिशन

मराठा समाजाचं आर्थिक मागसलेपण ठरवण्यासाठी राज्य सरकारने वेळोवेळी आयोगांची स्थापना केली होती. डल आयोग (साल १९९०), राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोग (२०००), खत्री आयोग (२००१) व बापट आयोग (२००८) आदी आयोगांनी मराठा समाज मागास नसल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर गायकवाड आयोग नेमण्यात आला. या आयोगाने उलट अहवाल देताना मराठा समाज मागास असल्याचं म्हटलं होतं. गायकवाड आयोगाने प्रथमच साद्यंत तपशील गोळा करून आणि शास्त्रशुद्ध विश्लेषण करून अहवाल दिला असल्याने तोच अचूक आहे, असा युक्तिवाद मराठा आरक्षण समर्थक अखिल भारतीय मराठा महासंघतर्फे करण्यात आलेला आहे. (prakash shendge oppose gaikwad Commission Report)

संबंधित बातम्या:

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

अमित ठाकरेंच्या हस्ते तीन शाखांचे उद्घाटन; नवी मुंबई पालिकेसाठी मनसे मैदानात

CM Bhandara Visit LIVE | मुख्यमंत्री ‘त्या’ चिमुकल्यांचा पालकांना धीर देणार, पण न्याय मिळणार?

(prakash shendge oppose gaikwad Commission Report)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.