फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. (Devendra Fadnavis security bjp)

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 2:58 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे. (security of Devendra Fadnavis and other bjp leaders reduced by Maharashtra government)

मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात केली आहे. नव्या निर्णयानुसार फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच भाजपच्या इतर नेत्यांच्या सुरक्षेतही कपात केलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड तसेच भाजप नेते आशिष शेलार यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात केली आहे.

राज ठाकरेंना झेड (Z) वरुन (y+) सुरक्षा

सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार भाजप नेत्यांसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यांना यापूर्वी झेड (Z) सुरक्षा दिलेली होती. नव्या निर्णयानुसार त्याची ही सुरक्षा व्यवस्था काढली असून त्यांना यानंतर वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल.

फडणवीसांच्या जीवाला धोका, तरी सुरक्षेत कपात

मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी यापूर्वी दिला होता. या अहवालात फडणवीसांच्या जीवाला अनेक बाजूने धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फडणवीसांची सुरक्षा कमी न करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांसोबतच गुप्तचर यंत्रणेनं हा अहवाल दिलाय. असे असताना सुद्दा फडणवीसांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

महासंचालकांची बदली होताच निर्णयाची अंमलबजावणी

मुंबई पोलिसांनी फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल दिल्यांनतर त्यांच्या सुरक्षेत कपात न करण्याची शिफारस करण्यात आली होती. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीसुद्धा फडणवीसांच्या सुरक्षा कपातीला विरोध केला होता. मात्र, जैस्वाल यांची बदली होताच सुरक्षा कपातीचा हा निर्णय घेतला गेला.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली आहे.

फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली आहे.

अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय + ती आता एक्स केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात यानंतर बुलेटप्रूफ कार नाही.

राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. जी आता Y + करण्यात आली आहे.

रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे वाय + सुरक्षा होती जी आता रद्द करण्यात आली आहे.

          >  भाजप नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच; काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडकावली

चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी : सचिन सावंत

शनिवार स्पेशल : राणेंनी जयंतरावांसाठी शिवलेला कोट, विलासराव- गोपीनाथरावांचा दिलदारपणा, महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचे 6 लाजवाब किस्से

(security of Devendra Fadnavis and other bjp leaders reduced by Maharashtra government)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.