चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी : सचिन सावंत

त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे," असेही सचिन सावंत म्हणाले. (Sachin Sawant Criticizes Chandrakant Patil) 

चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी : सचिन सावंत
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकी नऊ आले असतील,” अशी खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. (Sachin Sawant Criticizes Chandrakant Patil)

“ज्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका झाल्या आहेत. तिथेही भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे,” असेही सचिन सावंत कोल्हापुरात माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

..तोपर्यंत संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही

“गुरु गोळवलकरच्या यांच्या पुस्तकाचे जोपर्यंत दहन करत नाहीत तोपर्यंत त्यांना संभाजी महाराजांच नाव घेण्याचा अधिकार नाही. तुमचे आदर्श पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नामांतराबाबत आमची तात्विक भूमिका आहे. तुम्ही वर्षानुवर्षे संभाजी नगरच्या नावाखाली राजकीय पोळ्या भाजत आहात, याला आमचा विरोध आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.

समन्वय समितीत नामांतराचा निर्णय घेऊ

“हे तिन्ही पक्षाचं सरकार आहे. हा विषय फक्त निवडणुकीपुरतं समोर आणू नका, इतकंच आमचं म्हणणं आहे. सरकारवर या मुद्याचा काहीही परिणाम होणार नाही. हा विषय औरंगाबादपुरता मर्यादित आहे. त्यामुळे समन्वय समितीत नामांतराबाबतचा निर्णय होईल,” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली.

देवेंद्र फडणवीसांसह तीन नेत्यांची जे.पी. नड्डांशी दिल्लीत बैठक

दरम्यान शुक्रवारी (8 जानेवारी) महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार हे तीन बडे नेते दिल्लीत दाखल झाले होते. या तिन्ही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी  भाजपच्या दिल्लीतील या बैठकीत स्थानिक निवडणुकांमध्ये पराभव आणि आगामी निवडणुकांवर बैठक आयोजित केली होती.

आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला ताकद देण्यासाठी नवी रणनीती तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.  (Sachin Sawant Criticizes Chandrakant Patil)

संबंधित बातम्या : 

फडणवीसांसह महाराष्ट्रातील 3 नेते दिल्लीत, जेपी नड्डांशी खलबतं, कारण काय?

केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही : चंद्रकांत पाटील

Published On - 6:26 pm, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI