मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच; काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडकावली

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच; काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडकावली
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता

मुंबई महापालिकेला दोन महापालिका आयुक्त देण्याची काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडाकवून लावली आहे. (shivsena denied congress Demand of Two BMC Commissioner for mumbai)

भीमराव गवळी

|

Jan 10, 2021 | 11:13 AM

रत्नागिरी: मुंबई महापालिकेला दोन महापालिका आयुक्त देण्याची काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडाकवून लावली आहे. मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच, एकच आयुक्त पुरेसा आहे, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. (shivsena denied congress Demand of Two BMC Commissioner for mumbai)

काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिकेला दोन आयुक्त देण्याची मागणी केली होती. त्यावर विनायक राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई महापालिका हे एक क्षेत्र आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला एकच आयुक्त पुरेसा आहे. मुंबईचा कारभार एकछत्री व्हायचा असेल तर एकच आयुक्त योग्य आहे. मुंबईला दोन आयुक्त देण्याची गरज नाही, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. यापूर्वीही मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी झाली होती. त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ही संकल्पना आवडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त देण्याची मागणी म्हणजे मुंबईला तोडण्याचा घाट आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईला तोडण्याचा कोणीही प्रयत्न करू शकणार नाही, असं सांगतानाच मुंबईच्या हितासाठी एकच आयुक्त असणं कधीही योग्यच असल्याचं ते म्हणाले.

आघाडी एकत्र लढणार

मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यासाठी अभ्यास सुरू आहे, असं सांगत महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे संकेतही त्यांनी दिले. तसेच महापालिकेत शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव नाही

औरंगाबादचे नामकरण करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव देण्यात आलेला नाही. औरंगाबादच्या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राला देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांची व्याख्याच बदलण्याचं काम करत आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांची पंतप्रधान किंवा गृहमंत्री भेट घते नाहीत. शेतकरी वाचावा यासाठीच दिल्लीत आंदोलन सुरू आहे, असंही ते म्हणाले. (shivsena denied congress Demand of Two BMC Commissioner for mumbai)

संबंधित बातम्या:

“युतीत होतो म्हणून शिवसेनेची महापालिका, यंदा मात्र सगळीकडे भाजपचाच महापौर”

मुंबईला दोन पालिका आयुक्त हवे; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा

(shivsena denied congress Demand of Two BMC Commissioner for mumbai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें