अमित ठाकरेंच्या हस्ते तीन शाखांचे उद्घाटन; नवी मुंबई पालिकेसाठी मनसे मैदानात

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. (amit thackeray in navi mumbai to address party workers)

  • हर्षल पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 12:02 PM, 10 Jan 2021
अमित ठाकरेंच्या हस्ते तीन शाखांचे उद्घाटन; नवी मुंबई पालिकेसाठी मनसे मैदानात

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजाव अमित ठाकरे यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच राज ठाकरे यांनी अमित यांना पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले असल्याचं सांगितलं जात आहे. (amit thackeray in navi mumbai to address party workers)

अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि आमदार राजू पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 30 ते 35 गाड्यांच्या ताफ्यासह अमित ठाकरे वाशी टोल नाक्यावर आले. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा ताफा बेलापूरकडे रवाना झाला. दुपारी 3 वाजता अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन होणार आहे. पण अमित ठाकरे पावणे बारा वाजताच नवी मुंबईत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

अमित ठाकरे सुमारे तीन तास नवी मुंबईत थांबतील. त्यानंतर तिन्ही शाखांचे उद्धाटन करतील. या तीन तासात ते नवी मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. नवी मुंबईतील राजकीय वातावरण, मनसेची तयारी, मनसेचे संभाव्य उमेदवार, पक्षात येऊ शकणारे इतर पक्षाचे पदाधिकारी किंवा नगरसेवक आणि निवडणुकीची स्ट्रटेजी आदी विविध बाबींवर अमित ठाकरे हे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच अमित यांच्याकडून नवी मुंबईतील समस्यांचा आढावाही घेतला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (amit thackeray in navi mumbai to address party workers)

 

संबंधित बातम्या:

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

CM Bhandara Visit LIVE | मुख्यमंत्री ‘त्या’ चिमुकल्यांचा पालकांना धीर देणार, पण न्याय मिळणार?