AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपरमध्ये मराठी माणसावर घरात घुसून गुजराती कुटुंबाचा हल्ला, VIDEO

घाटकोपरमध्ये घरात घुसून एका मराठी कुटुंबावर गुजराती कुटुंबाने हल्ला केल्याच समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मारहाणीच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. याआधी सुद्धा घाटकोपरमध्ये मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळल्याची घटना घडली आहे.

घाटकोपरमध्ये मराठी माणसावर घरात घुसून गुजराती कुटुंबाचा हल्ला, VIDEO
marathi family Attack by gujarati familyImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 09, 2025 | 9:32 AM
Share

घाटकोपमध्ये एका मराठी कुटुंबाला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका गुजराती कुटुंबावर मारहाण करण्याचा आरोप आहेत. मागच्या काही महिन्यात मुंबई, ठाणे, कल्याण, मुंब्रा या भागात मराठी माणसावर हल्ले होण्याच्या त्यांना अपमानस्पद वागणूक देण्याच्या घटना वाढल्या आहेत. ताजी घटना घाटकोपर पूर्वेच्या रायगड चौक परिसरातील आहे. एका मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाने घरात घुसून मारहाण केल्याच सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. याआधी सुद्धा घाटकोपरमध्ये मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळल्याची घटना घडली आहे.

घाटकोपर पूर्वेला रायगड चौक परिसरात दोन्ही कुटुंब राहतात. मराठी कुटुंबाने घरात कुत्रा पाळला होता. त्यावरुन हा सर्व वाद झाला. मारहाणीची ही घटना रविवारची आहे. दोन्ही कुटुंबांची घर जवळ-जवळ आहेत. मराठी कुटुंबाने घरात कुत्रा पाळला आहे. त्यावर गुजराती कुटुंबाने आक्षेप घेतला होता. त्यावरुन ही सर्व वादावादी झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही कुटुंबात वादावादी होताना दिसतेय. त्यानंतर गुजरातील कुटुंबातील तीन पुरुष घरात घुसून मारहाण करताना दिसतात. त्याचा आवाज सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऐकू येतोय.

वाद आणखी पेटण्याची चिन्ह

या घटनेनंतर मराठी कुटुंबाने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी अजून गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. हा सगळा प्रकार घडण्याआधी खटके उडत असताना मराठी कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये एनसी नोंदवण्यासाठी गेलं होतं. पण त्यावेळी सुद्धा एनसी नोंदवून घेतली नव्हती. आता पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करतात ते महत्त्वाच आहे. मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती आणि पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. मनसेची भूमिका काय?

“व्हिडिओ मी पाहिला आहे. कुत्रा पाळल्यावरुन कोणी दादागिरी करत असेल तर ते चालणार नाही. 100 टक्के जाब विचारला जाईल. कुत्रा पाळण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. सगळे घरात पाळतात, पण तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही घरात जाऊन मारणार तर हे चुकीच आहे. 100 टक्के मनसे पद्धतीने काय करणार ते तुम्हाला दिसेल. हे चुकीच आहे. महाराष्ट्रात असं चालणार नाही. मनसे हे सहन करणार नाही” असं मनसेचे विभागअध्यक्ष महेंद्र भानुशाली म्हणाले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.