AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन

मुंबईसह राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. (mayor kishori pednekar slams bjp over vaccine shortage)

मुंबईकरांनो, गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, महापौर किशोरी पेडणेकरांचं आवाहन
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
| Updated on: Apr 10, 2021 | 2:14 PM
Share

मुंबई: मुंबईसह राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, लस उपलब्धतेवरून खोटे दावे केले जात असल्याचा दावा गळे काढणारे करत आहेत. हॉस्पिटलमध्ये लसीचा शून्य साठा आहे. प्रत्येक रुग्णालयाचं रेकॉर्ड असतं. त्यांची आकडेवारी खोटी आहे का? असा सवाल करतानाच मुंबईकरांनो, गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं. (mayor kishori pednekar slams bjp over vaccine shortage)

मुंबईत आजपासून वीकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर लॉकडाऊनची अंमलबजावणी होते की नाही याची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी काही कोविड सेंटर्सचीही पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. हॉस्पिटलचा लसीचा शून्य साठा आहे. एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचाच साठा उपलब्ध आहे. रुग्णालयाची आकडेवारी कशी खोटी असू शकते? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लस वाया जाण्याचं प्रमाणही कमी आहे. आकडेवारीवरून ते स्पष्ट झालं आहे. त्यामुळे गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. गळे काढणं हे त्यांचं कामच आहे, असा चिमटा किशोरी पेडणेकर यांनी काढला.

पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार

काही लोक गळे काढत होते. आता त्यांच्या घरातील पत्नी आणि मुली सुद्धा बोलायला लागल्या आहेत, असा टोला लगावतानाच राजकारण करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. पुण्याला अतिरिक्त लस दिली की नाही माहीत नाही. परंतु, लस देताना मुंबईला डावललं जाऊ नये, असं सांगतानाच राज्यात पूर्ण लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. लोकांचा विचार करूनच ते निर्णय घेतील, असंही त्या म्हणाल्या.

बेड्स अडवल्यास कारवाई

यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयांचीही पाहमी केली. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. लक्षणं नसतानाही खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण बेड अडवत आहेत. त्यांनी पालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये यावे. ज्यांना आयसीयू बेडची नितांत गरज आहे, त्यांना ते बेड मिळाले पाहिजे, विनाकारण लक्षणे नसलेल्यांनी बेड्स अडवून ठेवू नये, कोणत्याही रुग्णालयाने बेड अडवून ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

99 हजार लस आल्या

मुंबईत 99 हजार लस आल्या आहेत. दोन दिवस पुरेल एवढा हा साठा आहे, असं त्यांनी सांगितलं. कोविड वॉर्डमध्ये जाऊन मी पाहणी केली आहे. फक्त टीका करू नका. बाहेर येऊन काम करा. एसीत बसून टीका करण्यात अर्थ नाही, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. (mayor kishori pednekar slams bjp over vaccine shortage)

संबंधित बातम्या:

रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही; छगन भुजबळांची धक्कादायक प्रतिक्रिया

महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन झाल्यास नियम काय असू शकतात?

पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या, विजय वडेट्टीवारांची केंद्राकडे मागणी

(mayor kishori pednekar slams bjp over vaccine shortage)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.