देवेंद्र फडणवीसांनी फ्रस्टेशनमध्ये काहीही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना; महापौर किशोरी पेडणेकरांची खोचक टीका

विनायक डावरुंग

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2021 | 2:06 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूर्वी मुख्यमंत्री होते. (mayor kishori pednekar slams devendra fadnavis over corona situation in mumbai)

देवेंद्र फडणवीसांनी फ्रस्टेशनमध्ये काहीही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना; महापौर किशोरी पेडणेकरांची खोचक टीका
devendra fadnavis
Follow us

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वांनी पाहिलं आहे. त्यांनी मुंबई महापालिकेला काम करतानाही पाहिलं आहे. तरीही ते आता मुंबई महापालिकेवर टीका करत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करायला नको. देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, अशी खोचक टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. (mayor kishori pednekar slams devendra fadnavis over corona situation in mumbai)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. मुंबईच्या एका भागात कोरोनावर नियंत्रण आणल्याने त्याचं कौतुक झालं म्हणजे संपूर्ण मुंबईचं कौतुक होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालिकेचं कौतुक केलं नाही, असं फडणवीस म्हणाले होते. त्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारण्यात आले. त्यावर, माजी मुख्यमंत्र्यांनी असं विधानं करणं योग्य नाही. पण त्यांनी सार्वजनिकरित्या भाष्य केलं असेल तर त्यावर बोलावं लागेल. फडणवीसांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी मुंबईला काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीने असं काही बोलणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला पटण्यासारखं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी फ्रस्टेशनमध्ये काहीही बोलू नये, तसं होऊही नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.

पालिकेवर टीका नको, केंद्रातून लस आणा

लसींसाठीचं ग्लोबल टेंडर ही महापालिकेची नौटंकी होती, असा विरोधकांनी आरोप केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विरोधकांची नौटंकी संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. नौटंकी वगैरे शब्द विरोधकांनाच लागू होतात. आम्ही चांगलं काम केलं तर त्यांना मिरची लागते. नौटंकी करण्यापेक्षा सकारात्मक होऊन लोकांना कसं वाचवता येईल हे आम्ही पाहत होतो. आमचं काम जागतिक स्तरावर पोहोचलं आहे. ते विरोधकांच्या जिव्हारी लागलं आहे. विरोधक म्हटल्यावर ते टीका करणारच. त्यांच्याकडून शाबसकीची अपेक्षा नाही. जगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला शाबासकी दिली आहे. म्हणून विरोधक काय म्हणतात त्यावर रिअॅक्ट होण्यापेक्षा आम्ही आणखी काय चांगलं करू शकतो, यावर आमचा भर आहे, असं सांगतानाच विरोधकांनी पालिकेवर टीका करण्यापेक्षा केंद्रातून लस आणण्यासाठी वजन खर्ची घालावं, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.

सरकार नवं परिपत्रक काढणार

राज्य सरकारने अनलॉकबाबत तीन टप्प्यांमध्ये नियमावली केली आहे. मात्र, महापालिका स्वतंत्र परिपत्रक काढणार आहे. शासनाच्या नियमावलीत पालिका तिसऱ्या टप्प्यात आहे. पालिका आज संध्याकाळी आपलं नवं परिपत्रक जारी करणार आहे, असं त्या म्हणाल्या.

मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वाधिक

मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रेट 5.30 टक्के आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार मुंबईत तिसऱ्या गटात आहे. मुंबईतील बेड 35 टक्के भरले आहेत. ग्लोबल टेंडरही अपात्रं ठरलं आहे. लस बनविणाऱ्या कंपन्या टेंडर प्रक्रियेत भाग घेतील अशी अपेक्षा होती. मात्र, पुरवठादार कंपन्यांनी टेंडर भरले, असं सांगतनाच डॉ. रेड्डीज कंपनीशी चर्चा सुरू असून ही चर्चा सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (mayor kishori pednekar slams devendra fadnavis over corona situation in mumbai)

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकार कधी कोसळेल ते कळणारही नाही, प्रवीण दरेकरांचा दावा

देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात गव्हर्नर अपयशी ठरले तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडेल: राष्ट्रवादी

Maharashtra Coronavirus LIVE Update : नागपूर जिल्हयात कोरोनाचा पॅाझिटिव्ही रेट 1.75 टक्क्यांवर

(mayor kishori pednekar slams devendra fadnavis over corona situation in mumbai)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI