Mumbai Local | रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

Mumbai Local | रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
mumbai local

रविवारी 24 जानेवारीला मुंबई मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Nupur Chilkulwar

|

Jan 23, 2021 | 7:24 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल पूर्णपणे सुरु (Mega Block On Central Railway And Western Railway) करण्यात आलेली नाही. महिला आणि नोकरीवर जाणाऱ्या लोकांसाठी एका निश्चित वेळेसाठी लोकल रेल्वेची सेवा सुरु करण्यात आली आहे. असं असलं तरी दररोज मोठ्या प्रमाणात चाकरमानी लोकलने प्रवास करत आहे. मात्र, लोकलची ही सेवा येत्या रविवारी म्हणजेच 24 जानेवारीला खंडित होणार आहे. कारण, रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी हे आधी वाचून घ्या…. (Mega Block On Central Railway And Western Railway)

रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी 24 जानेवारीला मुंबई मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते  दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. रेल्वे रुळांच्या देखरेखीसाठी आणि दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मध्य रेल्वेवर कुठून कुठपर्यंत ब्लॉक?

“मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेतला जाईल. जलद मार्गावर सकाळी 11 ते  दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल”, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेवर कुठून कुठपर्यंत ब्लॉक?

तर, रेल्वेच्या पश्चिम मार्गावर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सांताक्रूझ ते गोरोगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. ही ब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

Mega Block On Central Railway And Western Railway

संबंधित बातम्या :

नकली ओळखपत्राद्वारे रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार, 5 दलाल अटकेत, सव्वा लाखांची तिकिटे जप्त

IRCTC IPO च्या भरघोस कमाईनंतर रेल्वे आणतोय आणखी एक IPO; कमाई करण्याची उत्तम संधी

रेल्वेप्रवास आता आणखी सोपा, तिकीट खरेदीमध्ये 10 टक्के सूट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें