रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई :रेल्वेच्या आज (रविवार) तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे. मध्ये रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 वा ते 3.15 वा. पर्यंत ब्लॉक […]

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक
लोकल ट्रेन
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई :रेल्वेच्या आज (रविवार) तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्ये रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगावच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्ये रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 वा ते 3.15 वा. पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 10.37 ते दुपारी 2.48 पर्यंत कल्याणवरुन सुटणाऱ्या अप जलद मार्गावर चालवणाऱ्या सर्व लोकल दिवा-परेल स्टेशन दरम्यान स्लो मार्गावर चालवण्यात येतील आणि परेल स्टेशनच्या दरम्यान सर्व स्टेशनवर थांबेल.

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप-डाऊन मार्गावर 11.10 वा ते 3.10 पर्यंत ब्लॉक आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 2.34 पर्यंत सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या सर्व लोकल आणि सकाळी 10.21 ते 2.41 पर्यंत वाशी ते सीएसएमटीला जाणाऱ्या सर्व लोकल अप हार्बर मार्गावर सुरु राहतील.

पश्चिम रेलवेवर सांताक्रुझ आणि गोरेगाव स्टेशन दरम्यान 10.35 ते 15.35 पर्यंत अप तथा डाऊन धिम्या मार्गावर जम्बो मेगा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. ब्लॉकच्या दरम्यान सर्व ट्रेन सांताक्रुझ-गोरेगाव स्टेशन दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील आणि काही गाड्या रद्द केल्या जातील. धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्यांना विलेपार्ले स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 5-6 च्या जलद मार्गावर डबल हॉल्ट दिला जाईल. राम मंदिर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या अनुपलब्धतेमुळे तेथे एकही ट्रेन थांबणार नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें