मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज (31 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. तसेच सीएसएमटी ते पनवेल संध्याकाळी 4 […]

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज (31 मार्च) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावरील पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ आणि इतर कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. तसेच सीएसएमटी ते पनवेल संध्याकाळी 4 पर्यंत एकही लोकल धावणार नाही.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान कसारा येथील पुलाचं कामही करण्यात येणार आहे. कल्याणकडे जाणाऱ्या सर्व लोकल मुलुंड स्थानकावरुन जलद मार्गावर वळवल्या जातील. या सर्व लोकल सकाळी 10.47 ते 3.50 दरम्यान ठाणे, दिवा आणि डोबिंवली स्थानकावर थांबतील.

कल्याणवरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 दरम्यान दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्निमसवरुन कल्याणकडे जाणऱ्या सर्व लोकल सकाळी 10.05 ते 2.54 दरम्यान घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकावर थांबतील.

हार्बर मार्गावर

कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटीवरुन सकाळी 10.34 ते 3.08 दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेल जाणाऱ्या सर्व लोकल तसेच पनवेलवरुन सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व लोकल या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावर विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.