MHADA : ‘म्हाडा’नं स्वप्न दाखवलं, सत्य परिस्थिती वेगळीच! उत्पन्नाच्या मर्यादेत बदल, अनेक प्रश्नांचा उलगडा होईना!

अल्प उत्पन्न गटातील नागरिक, मध्य व उच्च गटातील घरांसाठी आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिक उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

MHADA : 'म्हाडा'नं स्वप्न दाखवलं, सत्य परिस्थिती वेगळीच! उत्पन्नाच्या मर्यादेत बदल, अनेक प्रश्नांचा उलगडा होईना!
म्हाडा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:39 PM

मुंबई :  छोटसं का होईना आपलं हक्काचं घर (House) असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र, अलिकडेच घर खरेदी करण्याच्या जाचक अटींमुळे अनेकांना घर घेणं अडचणीचं ठरतंय. त्यातच आता कमी किमतीचं आणि दर्जेदार घर मिळणं अवघड झालंय. सिडको (Cidco) आणि म्हाडाचं घर स्वस्त असतं ते दर्जेदार देखील असतात. मात्र, यामध्ये उत्पन्न गटाची (Income Limits)अडसर अनेकांना त्रासदायक ठरतेय. हीच अडचण दूर करण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणानं घेतलाय. गृहनिर्माण योजनांसाठी तसेच सदनिकांच्या वितरणासाठी विविध गटांसाठी उत्पन्नाची मर्यादा आणि घरासाठीचे क्षेत्रफळ सुधारित अर्ज करता येत होते. मात्र, या निर्णयामधील त्रुटी दूर करून सुधारित निर्णय जारी करण्यात आला आहे. उच्च गटासाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा आता काढण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे घर घेणाऱ्यांना दिलासाच मिळालाय. त्यामुळे आता अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांसाठीसुद्धा अर्ज करता येणार आहे. अल्प उत्पन्न गटातीस नागरिक, मध्य व उच्च गटातील घरांसाठी आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिक उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

नेमका काय बदल झालाय?

  1. म्हाडा प्राधिकरणाच्या महाराष्ट्रातील विविध मंडळांतील घरांच्या सोडतीतील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत बदल
  2. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार हा बदल करण्यात आला आहे
  3. अत्यल्प गटातील व्यक्तीला म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासह उर्वरित तिन्ही म्हणजे अल्प, मध्यम, उच्च उत्पन्न गटांमध्ये अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे
  4. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटात अर्ज करू शकते
  5. हे सुद्धा वाचा
  6. अत्यल्प आणि अल्प गटातील अर्जदारांची उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेता त्यास उच्च उत्पन्न गटाची घरं परवडणार कशी, असा प्रश्न आहे
  7.  उच्च उत्पन्न गटातील घरे परवडणार कशी, याचा उलगडा गृहनिर्माण विभागाच्या आदेशातून झालेला नाही.
  8. त्यामुळे ही केवळ घोषणा वा दिवास्वप्न ठरू नये, असं देखील अनेकांना वाटतंय.

निर्णयात चारही गटांतील वार्षिक उत्पन्न गटात बदल केलेत. त्यामध्ये उच्च उत्पन्न गटासाठी कमाल उत्पन्न मर्यादेचं बंधन ठेवण्यात आलेलं नाहीय. म्हाडाच्या मुंबईसह इतर मंडळांकडून घरांची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी घरांची सोडत काढली जात असते. गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किंमती देखील वाढत असल्याचं दिसतंय.  आता त्यामध्येच  गृहनिर्माण विभागाने या सोडतीसाठी उत्पन्न मर्यादा, अर्ज दाखल करण्यातील गटांतील अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यानं काहींना दिलासा वाटतोय तर काहींना त्यात त्रूटी काढल्या आहेत.

उत्पन्न मर्यादेत वाढ

  1. अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक मर्यादा 6 लाख रुपये
  2. अल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक 9 लाख रुपये उत्पन्न
  3. मध्यम उत्पन्न गटासाठी 12 लाख रुपये उत्पन्न निश्चित केले

वरील मर्यादा मुंबई, पुणे, नागपूर महानगर क्षेत्र, नागपूर यासाठी लागू असणार आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.