MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी

मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेट क्षेत्रात आपली वाटचाल सुरु केली

MPL ची सूत्रं स्वीकारताच मिलिंद नार्वेकरांची बॅटिंग, ठाकरे-पवारांच्या फोटोसह होर्डिंगबाजी
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 1:29 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात आपली इनिंग सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association – MCA) मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची सूत्रे नार्वेकरांनी हाती घेतली. त्यानंतर मुंबईकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारी नार्वेकरांची होर्डिंग्स मुंबईत लागली आहेत. (Milind Narvekar Hoarding with Sharad Pawar Uddhav Thackeray)

मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत मिलिंद नार्वेकर यांनी क्रिकेट क्षेत्रात आपली वाटचाल सुरु केली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत (AGM) मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंत यांची MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी नार्वेकरांकडून मुंबईकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स मुंबईत झळकली.

नार्वेकरांच्या पोस्टरवर कोण कोण ?

या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची छायाचित्रे आहेत. तसंच, मिलिंद नार्वेकर यांच्या नावापुढे चेअरमन – मेम्बर कौन्सिल MPL आणि सेक्रेटरी- शिवसेना ही दोन पदं लागली आहेत.

मिलिंद नार्वेकर यांची एमपीएलच्या चेअरमनपदी निवड होणं अपेक्षित मानलं जात होतं. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकरांच्या रुपाने शिवसेनेची एमसीएच्या कार्यक्षेत्रात थेट एन्ट्री झाली आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

संबंधित बातम्या :

MPL च्या गव्हर्निंग कौन्सिलच्या चेअरमनपदी मिलिंद नार्वेकर बिनविरोध

…आणि म्हणून मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या पाया पडले

(Milind Narvekar Hoarding with Sharad Pawar Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.