…आणि म्हणून मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या पाया पडले

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) वार्षिक सर्वसाधरण सभेत (AGM) ही बिनविरोध निवड करण्यात आली.

...आणि म्हणून मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या पाया पडले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचीव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि सुरेश सामंत (Suresh Samant) यांची MPL च्या गव्हर्निग काउन्सिलच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) वार्षिक सर्वसाधरण सभेत (AGM) ही बिनविरोध निवड करण्यात आली. (Milind Narvekar take blessings of Sharad Pawar after being elected as Chairman of MPL Governing Council)

MCA ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर शरद पवार व्यासपीठावरून खाली आले. त्यावेळी नार्वेकर यांनी पवार यांचे चरणस्पर्श करत आभार मानले. इतकंच नाही तर माझी निवड झाली त्याबद्दल धन्यवाद पुढे चांगले काम करू असंही नार्वेकरांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी खडसे आणि संजय राऊतांच्या पत्नीला पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीबद्दल विचारलं असता शरद पवार आणि नार्वेकर या दोघांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

वानखेडे स्टेडियमवर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेला एमसीएचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. तसेच या बैठकीला शरद पवारांसह अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर यांची एमपीएलच्या चेअरमनपदी निवड होणं अपेक्षित मानलं जात होतं. नार्वेकरांची निवड झाल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर मिलिंद नार्वेकरांचा एमसीएच्या कार्यक्षेत्रात थेट प्रवेश झाला आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविलं आहे.

मिलिंद नार्वेकरांचा अल्पपरिचय

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर पडली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीएपदी निवड झाली. तेव्हापासून ते आजतागायत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत. (Milind Narvekar take blessings of Sharad Pawar after being elected as Chairman of MPL Governing Council)

संबंधित बातम्या –

संजय राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस, भाजपची भूमिका काय?

BREAKING : संजय राऊतांच्या पत्नीला ईडीचं समन्स, 29 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश

(Milind Narvekar take blessings of Sharad Pawar after being elected as Chairman of MPL Governing Council)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI