मुंबईत कॉलेज विद्यार्थिनीची छेड, दूधवाल्याला बेड्या

मुंबईत कॉलेज विद्यार्थिनीची छेड, दूधवाल्याला बेड्या

मुंबई : मुंबईत महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दूध विक्रेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ छेड काढल्यानंतर एका तरुणीने तक्रार दाखल केली होती.

एसएनडीटी कॉलेजबाहेर 23 जुलै रोजी तक्रारदार तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत उभी होती. त्यावेळी आरोपी दूधवाला तिच्या जवळ आला आणि त्याने तिला नकोसा स्पर्श करुन पळ काढला. यानंतर तरुणीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

छेडछाडीची घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आतच मालाड पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी 26 वर्षीय आरोपी नबी हुसेन शेखला अटक केली. नबी शेख हा कांदिवली भागातील एका तबेल्यात काम करतो.

पोलिसांच्या तपासात नबी शेखने एकापेक्षा अधिक तरुणींसोबत असा विकृत आणि किळसवाणा प्रकार केल्याचं समोर आलं. नबी शेखला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

नबी शेखवर अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, आणखी किती मुली त्याच्या या विकृतपणाला बळी पडल्या आहेत, या सर्व प्रकारचा तपास पोलिस करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI