नव्वदीच्या आजीची ‘कोरोना’वर मात, ‘वरळी मॉडेल’ आशेचा किरण, आदित्य ठाकरेंना विश्वास

जी दक्षिणमध्ये 25 एप्रिलपर्यंत सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने याच भागातील सर्वाधिक रुग्ण बरेही झाले आहेत. (Aditya Thackeray Worli model for Corona Covid19)

नव्वदीच्या आजीची 'कोरोना'वर मात, 'वरळी मॉडेल' आशेचा किरण, आदित्य ठाकरेंना विश्वास

मुंबई : मुंबईतील वरळी भागात राहणाऱ्या, वयाची नव्वदी पार केलेल्या आजींनी ‘कोरोना’वर मात केली आहे. आजींचा व्हिडिओ ट्वीट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘वरळी मॉडेल’ हा आशेचा किरण असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. (Aditya Thackeray Worli model for Corona Covid19)

‘वरळी मॉडेल आशादायी वाटत आहे. ‘कोरोना’ निगेटिव्ह ठरलेली 90 वर्षांवरील ही महिला आम्हाला प्रेरणा देते. त्यांनी ‘कोविड19’शी लढा दिला आणि आता त्या घरी परतल्या आहेत. आपल्याला हेच दाखवायचं आहे. माणुसकी म्हणजे दुसरं काही नाही, तर इतरांना प्रेरणा देऊन नेटाने उभे राहणे’ असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

जी दक्षिण वॉर्डचा भाग असलेल्या वरळीमध्ये सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. जी दक्षिणमध्ये 25 एप्रिलपर्यंत सहाशे जणांना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने याच भागातील सर्वाधिक रुग्ण बरेही झाले आहेत. आतापर्यंत ‘जी दक्षिण’मधील 151 पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. (Aditya Thackeray Worli model for Corona Covid19)

‘कठीण वेळ कधीच फार काळ टिकत नाही, परंतु चिकाटी असलेले लोक त्यावर मात करतात” ही म्हण सिद्ध करणाऱ्या ‘जी दक्षिण’मधील 151 कोरोनाबाधितांना आजपर्यंत विविध हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.’ असं ट्वीट ‘जी दक्षिण’ वॉर्डच्या ट्विटरवरुन करण्यात आलं आहे.

‘डिस्चार्ज मिळलेल्या रुग्णांमध्ये यात सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. 5 वर्षांच्या चिमुकलीपासून 90 वर्षांच्या आजीपर्यंत. कोरोना व्हायरसला हरवल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला’ अशी माहिती देण्यात आली आहे.

(Aditya Thackeray Worli model for Corona Covid19)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI