AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया…

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झालीय. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहेत.

मंत्री नवाब मलिकांना ईडीकडून अटक, पुढे काय होणार? उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया...
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक.
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 4:12 PM
Share

मुंबईः महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर ईडीने (ED) अटक केलीय. नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीने सुरूय. त्यासाठी त्यांना पहाटेच चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र, दुपारी त्यांच्या अटकेची वार्ता येऊन धडकली. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झालीय. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहेत. याप्रकरणातच आता मलिक यांना अटक करण्यात आलीय. आता पुढे काय होऊ शकते, याबद्दल ज्येष्ठ विज्ञीज्ञ उज्ज्वल निकम टीव्ही 9 मराठीशी बोलताना काय म्हणाले, ते जाणून घ्या…

नेमका आरोप काय?

मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. या व्यवहाराचे दाऊद इब्राहिमचा ईडी कस्टडीतील भाऊ इकबाल कासकरकडून पुरावे मिळाल्याचे समजते.

ईडी कस्टडी मागू शकते…

उज्ज्वल निकम म्हणाले की, अटक होणं हीच अडचणीची सुरुवात आहे. अटक होणार की नाही, पुरावा आहे की नाही, जोपर्यंत ईडीचे अधिकारी कोर्टात सादर करत नाहीत, तोवर काही होत नाही. ईडी कस्टडी मागू शकतात. समाधानकारक स्पष्टीकरण होत नसेल, तर ईडीचे अधिकारी कोर्टाकडे कस्टडी मागू शकतात. याशिवाय मलिकांचे वकील सांगू शकतात की, आधीच चौकशी झाली आहे.

…तर चॅलेंज करता येईल

उज्ज्वल निकम म्हणाले की, ईडी कस्टडी मिळाली, तर ती चॅलेंज करता येईल. मॅजिस्ट्रेड कस्टडी मिळाली, तर जामिनाचा अर्ज करावा लागेल. मात्र, राजकीय विरोधक जे बोलले. ईडी येईल, अटक होईल, तेही न्यायालय तपासून पाहिल. आता अटकेनंतर नवाब मलिकांपुढे तीन पर्याय असू शकतात…

मलिकांसमोरचे पर्याय…

1) ईडी कस्टडी मिळाली तर ती चॅलेंज करता येईल.

2) मॅजिस्ट्रेड कस्टडी मिळाली तर जामीनाचा अर्ज करता येईल.

3) राजकीय विरोधक जे बोलले आहेत की ईडी येईल, अटक होईल. हे सारे न्यायालय तपासून पाहिल. हे पटवून देत जामीन मिळवता येईल.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.