AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dino Morea : डिनो मोरियाचा पाय खोलात! ईडीने बजावले समन्स, आता कोण गोत्यात येणार पुढे?

Dino Morea ED : अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीअगोदर मोठे काही तरी घडण्याचे संकेत कालच मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. काय आहे अपडेट?

Dino Morea : डिनो मोरियाचा पाय खोलात! ईडीने बजावले समन्स, आता कोण गोत्यात येणार पुढे?
डिनो मोरियाच्या अचडणीत वाढImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 08, 2025 | 8:34 AM
Share

Mithi River silt embezzlement case : मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरियासह ८ जणांना ‘ईडी’ने समन्स बजावले. ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई सुरू आहे. डिनो मोरियासह आठ जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. मुंबई, कोची, त्रिशूर येथे १८ ठिकाणी छापे, रोकड, बँक खाती, डिमॅट अकाउंट, डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीअगोदरच मोठे काही तरी घडण्याचे संकेत कालच मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. हे प्रकरण ही त्याला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.

ईडीचा तपास वेगात

डिनो मोरिया व केतन कदम यांच्यात २०१९-२२ दरम्यान आर्थिक व्यवहार, मालमत्ता व पैशाच्या स्रोतांची चौकशी सुरू आहे. पालिकेच्या तीन अधिकार्‍यांसह पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थ व दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार तपास वेगात असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने महाराष्ट्रासह केरळपर्यंत या प्रकरणाची पाळंमुळं खोदण्याचे काम सुरू केले आहे.

मिठी नदी घोटाळा आहे तरी काय?

मिठी नदीची साफसफाई किंवा ‘desilting’ करण्यासाठी 2021–22 आणि 2022–23 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेने जवळपास 65 कोटी रुपये खर्च केले होते. मुंबईला महापूराचा धोका होऊ नये, मुंबईत पाणी साचू नये हा यामागील उद्देश होता. पण पुढे तपासात असे पुढे आले की, प्रत्यक्षात कोणतीही नाले, नदी सफाई करण्यात आली नाही. या सफाईसाठी बिल, बनावट अहवाल सादर करण्यात आले. ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेताना त्यात अनियमितता करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा मोठा घोटाळा झाल्याचा कथित आरोप आहे.

नितेश राणेंचे वक्तव्य चर्चेत

डिनो मोरिया प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा राणे यांनी केला. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचा चिमटा राणे यांनी काढला.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.