Nitesh Rane : … तर आदित्य ठाकरेंना अटक? उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो; नितेश राणेंच्या वक्तव्याने एकच खळबळ
Nitesh Rane on Aditya Thackeray : एकीकडे राज्यात उद्धव सेनेच्या मनसे युतीची चर्चा जोरात असतानाच मंत्री नितेश राणे यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, या त्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे राज्यात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. एकेमागून एक निरोप येऊन धडकत आहेत. तर उद्धव ठाकरे म्हणतात तसा उभा महाराष्ट्र, मनसे-उद्धव सेनेच्या युतीची बातमी कधी धडकते याची आतुरतेने वाटत पाहत आहे. नेमकं त्याचवेळी मंत्री नितेश राणे यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय खळबळ उडवली आहे.
आदित्य ठाकरेंच्या अटकेचे संकेत
डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो अस म्हणत मंञी नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिलेत. डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ठाकरे बंधुच्या एकत्रीकरणाची चर्चा असल्याचाही राणे म्हणाले.
तर आदित्यची तुरुंगवारी निश्चित
डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. डिनो मोरियाच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुंबई नालेसफाई प्रकरणात त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच प्रकरणाकडे इशारा करत मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा केला. डिनो मोरिया कोणासोबत बसायचा, कोणासोबत भावनिक आणि शारीरिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचा चिमटा त्यांनी काढला.
राज-उद्धव युतीची उडवली खिल्ली
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चेची नितेश राणेंनी तुळजापुरात खिल्ली उडवली. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी या दोघांच्या युतीवर चांगलेच तोंडसुख घेतले.
हिंदूत्व सोडल्याने ठाकरे ब्रँड बुडाला
हिंदूत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा नितेश राणे यांनी ठाकरेंना टोला लगावला. नितेश राणे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर सडेतोड मतं मांडली. त्यांनी मनसे-सेना युतीवर तोंडसुख घेतलेच पण आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत देऊन धुराळा उडवून दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा राजकीय गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
