सरकारने ठरवलेले दरपत्रक बॅनरवर, कोरोनाग्रस्तांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना मनसेचा दणका

जे कोणी रुग्णांची फसवणूक करेल त्याल मनसेचा दणका बसेल, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले (MNS Banner on Private Hospital Overcharging) आहेत.

सरकारने ठरवलेले दरपत्रक बॅनरवर, कोरोनाग्रस्तांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना मनसेचा दणका
Namrata Patil

|

Jun 28, 2020 | 5:04 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांकडून हवे तेवढे पैसे उकळत आहे. याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट थांबताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मनसेने सरकारने रुग्णालयांना ठरवून दिलेले दरपत्रक आपल्या बॅनरवर छापले आहेत. तसेच जे कोणी रुग्णांची फसवणूक करेल त्याल मनसेचा दणका बसेल, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले आहेत. (MNS Banner on Private Hospital Overcharging Money From covid patient)

“रुग्णांच्या फसवणुकीविरोधात मनसे खंबीर आहे. जर कोणतेही रुग्णालय कोविड 19 च्या रुग्णांकडून शासनाने प्रमाणित केलेल्या नियमाचे उल्लंघन करुन स्वत:चे अधिक दर लावत असल्यास आम्हाला संपर्क करा, मनसे दणका नक्कीच बसेल,” अशा आशयाचे बॅनर मनसेने लावले आहेत. यात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे फोन नंबरही देण्यात आले आहेत.

या बॅनरवर सरकारने रुग्णालयांना ठरवून दिलेले दरपत्रक दिसत आहे. तसेच जर कोणी या दरापेक्षा जास्त दर आकारले तर तक्रार करण्यासाठी नंबरही दिले आहेत. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी हे बॅनर छापले आहे.

काही दिवसांपूर्वी बोरीवलीतील खाजगी रुग्णालय अव्वाच्यासव्वा रक्कम आकारत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मनसेने आता अशा बॅनरच्या माध्यमातून नागरीकांना आवाहन केले आहे.  (MNS Banner on Private Hospital Overcharging Money From covid patient)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Cabinet Decision : आशा सेविकांचं मानधन 3 हजारांवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे 12 निर्णय

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य, आशा सेविकांचे मानधन वाढवण्याचा शब्द

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें