AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य, आशा सेविकांचे मानधन वाढवण्याचा शब्द

‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करु, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना दिलं आहे (Ajit Pawar promise to Amit Thackeray to increase asha worker pay).

अमित ठाकरेंची मागणी अजित पवारांकडून मान्य, आशा सेविकांचे मानधन वाढवण्याचा शब्द
| Updated on: Jun 23, 2020 | 5:17 PM
Share

मुंबई : ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करु, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना दिलं आहे. अमित ठाकरे यांनी आज (23 जून) मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकरदेखील होते (Ajit Pawar promise to Amit Thackeray to increase asha worker pay).

अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आणि अजित पवार यांच्यात आज बैठक झाली. या बैठकीत ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनाबाबत चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी अमित ठाकरेंची मागणी मान्य केली. त्यांनी अमित ठाकरे यांना ‘आशा’ स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजारांनी वाढ करु, असं आश्वासन दिलं. याशिवाय याबाबत लवकरच घोषणा करु, असंदेखील अजित पवार यांनी सांगितलं (Ajit Pawar promise to Amit Thackeray to increase asha worker pay).

केंद्राकडून ‘आशा’ स्वयंसेविका यांना सध्या दोन हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. राज्याकडून त्यांना दोन हजार रुपये मिळाल्यास त्यांचे एकूण मानधन चार हजार होईल.

हेही वाचा : अमित ठाकरे राजभवनात, निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा

काही दिवसांपूर्वी काही ‘आशा’ स्वयंसेविकांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त दोन हजार रुपये मानधन मिळत असल्याची तक्रार त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे केली होती. याशिवाय त्यांनी सरकारकडून मानधन वाढवून मिळावं यासाठी अमित ठाकरे यांची मदत मागितली.

अमित ठाकरे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना याबाबत पत्र लिहित ‘आशा’ स्वयंसेविकांचं मानधन वाढवून देण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली.

“आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकट काळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून द्यावा”, असं अमित ठाकरे अजित पवार आणि राजेश टोपे यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी अमित ठाकरे यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या बारा तासात आपला शब्द पाळत त्यांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती.

हेही वाचा : अमित ठाकरेंचे अजित पवारांना पत्र, राज्यपालांचीही भेट घेणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.