अमित ठाकरे राजभवनात, निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा

निवासी डॉक्टरांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.

अमित ठाकरे राजभवनात, निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा
Follow us
| Updated on: Jun 22, 2020 | 1:32 PM

मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह अमित हे राजभवनात गेले होते. ‘कोविड योद्धा’ असलेल्या निवासी डॉक्टरांच्या पदव्युत्तर परीक्षांबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती करणारे पत्र अमित ठाकरे यांनी राज्यपालांना दिले. (Amit Thackeray meets Governor Bhagatsingh Koshyari on Residential Doctors Issue)

“संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे 2500 निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री आणि डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे विद्यार्थी – निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे. ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही” असं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातमी : अमित ठाकरेंचे अजित पवारांना पत्र, राज्यपालांचीही भेट घेणार

निवासी डॉक्टरांनी सुचवलेला पर्याय पत्रासोबत जोडत त्यांनी सुचवलेल्या पर्यायाची आपण गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.

याआधी ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले होते.

“आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकट काळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.” अशी माहिती अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली.

(Amit Thackeray meets Governor Bhagatsingh Koshyari on Residential Doctors Issue)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.