सुमेध साळवे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात फार महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात नवे राजकीय समीकरणं प्रत्यक्ष निवडणुकीत उदयास येताना दिसतील. पण हे नवे समीकरण शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी धक्का देणारे असू शकतात. कारण तीन मोठे पक्ष ठाकरे गटाविरोधात आगामी निवडणुकांमध्ये प्रत्यक्षपणे आव्हान देताना दिसतील. हे तीन पक्ष म्हणजे भाजप, शिंदे गट आणि मनसे. कारण या तीनही पक्षांमध्ये सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. तीनही पक्षांचे तरुण नेते पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. त्यामुळे आगामी काळात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या तीन पक्षाच्या आव्हानांना कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.