AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यासोबतच्या दिल्लीतल्या बैठकीत काय ठरलं? राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित भूमिका मांडली. राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला तेव्हाच याबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अमित शाह यांच्यासोबतच्या दिल्लीतल्या बैठकीत काय ठरलं? राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
| Updated on: Apr 09, 2024 | 8:21 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित भूमिका मांडली. राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला तेव्हाच याबाबतची उत्सुकता वाढली होती. अखेर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “जसे तुम्ही ऐकत होता, तसा मीही ऐकत होतो. तुम्ही वाचत होतो, मीही वाचत होतो. अमित शाह यांच्या भेटीनंतर चक्र सुरू झाली. हे आमचे बांधव (मीडिया) त्यांचा काही दोष नाही. चॅनेलवाले. रोजचे चॅनल्स… त्याला मी नाव ठेवलंय आज मला असं वाटतंय. लोकांना विचारायला कशाला पाहिजे, दे ठोकून आपली बातमी. वाट्टेल त्या बातम्या सुरू होत्या. मी एन्जॉय करत होतो. काय बोलायचे ते बोला. मला वाटेल तेव्हा बोलेन. अमित शाह यांना भेटायला गेलो. त्यावेळी ते आणि मी होतो. तुम्हाला कुठून कळलं. मी दिल्लीत पोहोचलो काय. राज ठाकरेंना १२ तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची बैठक होती. आदल्या दिवशी पोहोचलो. त्यात थांबायचं काय आलं. हे थांबत नाही. मला असं वाटते”, असं राज ठाकरे म्हणाले.

“तिकडे काही पत्रकार भेटले. म्हटले कधी भेटायचं. म्हटलं मला नाही भेटायचं. माझ्याकडे सांगण्यासारखं काही नसेल तर का भेटू. भेट झाली. विमानतळावर आलो. इकडून जाताना पण वोह देखो जा रहे है… हकल्ली हे असतात. पूर्वी आचारसंहितेवाले असायचे. एकदा मी बाथरूमला चाललो होतो. विनोदाने सांगत नाही. खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंय. मी म्हटलं आपलं आपणच करायचं की आपण काही सहकार्य करणार आहात. कुठे जरा मोकळीक नाही. घराच्याबाहेर पत्रकार बसलेले असतात. एखादी गोष्ट ठरली तर मी सांगेन ना”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘तेव्हाच शिवसेनाप्रमुख झालो असतो’

“मी लपून लपून निवडणुका लढवेल? मतदारांना सांगू नको. कुणाला सांगू नको असं काही आहे का. काही ठरलं तर पत्रकार परिषद घेऊन सांगेल ना… आता काही मिळत नाही मग एपिसोड कसा पुढे न्यायचा. राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे मूर्खाने मला व्हायचे असते तर तेव्हाच झालो नसतो का. तेव्हा ३२ आमदार सहा सात खासदार म्हणाले. आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा सुरू केला. त्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वताचा पक्ष काढेन पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

“समजलंच नाही. जाऊन दे. तो झाला भूतकाळ. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. १८ वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही. मी हसत होतो. त्यांचे काही करू शकत नाही. आज मला असे वाटते. वेगवेगळ्या बातम्या येत होत्या”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

यावेळी राज ठाकरे यांनी सर्वात पहिला निशाणा निवडणूक आयोगावर साधला. “जवळपास 5 वर्षांनी महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकाच्या निवडणुका आता होतील आता होतील, असं म्हणता म्हणता अजून होत नाहीत. २०१९ च्या निवडणुकांनंतर आता निवडणुका होत आहेत. त्यानंतर आता आचारसंहितावाले जागी झाले आहेत. काल मी एक बातमी वाचली. आचारसंहिता म्हणून महापालिकेचे डॉक्टर आणि नर्सेस यांना मतदानाच्या कामात गुंतलं आहे. डॉक्टर मतदारांच्या नाळ्या तपासणार का? की नर्सेस मतदारांचे डापर्सं बदलणार आहेत, ज्याच्यासाठी त्यांची नेमणूक केली आहेत तिथे ते नसावेत का? निवडणुका होणार आहेत हे निवडणूक आयोगाला माहिती असते. मग समांतर एक फळी का उभी करत नाहीत?”, असा सवाल करत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.