पाकड्या कलाकारांना रोखा, मनसेचा अटीतटीचा इशारा

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना लक्ष्य केलं आहे. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे चित्रपट सिनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा इशारा दिला. “आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय म्युझिक […]

पाकड्या कलाकारांना रोखा, मनसेचा अटीतटीचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना लक्ष्य केलं आहे. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे चित्रपट सिनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा इशारा दिला.

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय म्युझिक कंपन्या अजूनही पाकिस्तानी गायकांचे म्युझिक अल्बम बनवत आहेत. ही गाणी पाकिस्तानात रेकॉर्ड करुन भारतात पाठवली जात आहेत. या गोष्टी थांबवायला हव्यात. जर ही थेरं थांबली नाहीत, तर मनसे स्टाईलने धडा शिकवू” असा सज्जड दम अमेय खोपकर यांनी दिली.

मनसेने नेहमीच पाकिस्तानी कलाकार, गायक, संगीतकार, खेळाडूंना विरोध केला आहे. पाकिस्तानी दहशतवादी भारतावर सातत्याने हल्ला करुन आपल्या जवानांना मारतात, मग पाकिस्तानला भारतात थारा का द्यायचा? असा प्रश्न मनसेने सातत्याने उपस्थित करत केला आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध भारताने तोडायला हवे, मग ते राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो, सर्व संबंध तोडा अशी मागणी मनसेची आहे. त्यातच पुलवामामध्ये काल झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना कामं देणाऱ्या भारतीय कंपन्यांना आज कडक इशारा दिला आहे.

बुलडाण्याचे दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला.  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन वीर धारातीर्थी पडले.  मलकापूर येथील 49 वर्षीय संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील नितीन राठोड या दोन जवानांना वीरमरण आलं. संजय राजपूत हे 115 बटालियनचे होते.

नेमकं काय घडलं?

दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.

शरद पवारांचा मोदींवर हल्ला

मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असत. मी मात्र आता राजीनाम्याची मागणी करणार नाही. पण याबाबत सरकारचे अपयश या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाल्याचं शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या 

मी मोदींचा राजीनामा मागणार नाही: शरद पवार

भारताकडून पाकिस्तानचा MFN दर्जा रद्द, MFN म्हणजे नेमकं काय?

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण? 

गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले 

Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध

Pulwama Attack : पुलवामात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.