AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

मनसेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यापासून अमित ठाकरे हे पक्षाच्या कामात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. | Amit Thackeray

अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
| Updated on: Oct 22, 2020 | 3:49 PM
Share

मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र व पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप येत असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. (Raj Thackeray’s son Amit Thackeray gets discharged from hospital)

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांना अचानक ताप आला होता. यानंतर त्यांची कोरोना आणि मलेरिया टेस्टही झाली होती. या दोन्ही टेस्ट नेगेटिव्ह आल्या होत्या. यानंतरही त्यांचा ताप जात नसल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मनसेच्या नेतेपदी नियुक्ती झाल्यापासून अमित ठाकरे हे पक्षाच्या कामात मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. ते सातत्याने लोकांच्या भेटीगाठी घेत होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, डॉक्टरांचे प्रश्न अशा विविध कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.

आरेतील झाडे वाचवण्यासाठी अमित ठाकरे उतरले होते मैदानात

मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, अशी भूमिका त्यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा, घरीच क्वारंटाईन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या:

अजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

(Raj Thackeray’s son Amit Thackeray gets discharged from hospital)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.