AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….तर शेवटी आम्हाला खळ्ळखट्याक करावं लागेल, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा

कंत्राटदार कामाचा दर्जा दाखवत नसतील तर आम्हाला शेवटी खळ्ळ खट्याक करावं लागेल, असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. | MNS MLA Raju Patil

....तर शेवटी आम्हाला खळ्ळखट्याक करावं लागेल, मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
राजू पाटील, आमदार, मनसे
| Updated on: Mar 13, 2021 | 10:31 AM
Share

कल्याण : कंत्राटदार कामाचा दर्जा दाखवत नसतील तर आम्हाला शेवटी खळ्ळ खट्याक करावं लागेल, असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी दिला आहे. कल्याण-शीळ (kalyan shil Road) रोडच्या कामाच्या दर्जावरुन त्यांनी हा इशारा दिला आहे. (MNS MLA Raju Patil Warns MSRDC Over road work)

गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-शीळ रोड हा 6 पदरी करून यावर कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर चालू असून कल्याण फाटा ते पालवा पर्यंत जवळपास 80%  काम पूर्ण झालंय. तर पुढील रस्त्यावर सुद्धा कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम चांगल्या दर्जाचे केले जात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राजू पाटील यांचं एमएसआरडीसीला पत्र

कारण याच नवीन काँक्रीट रस्त्याला आता खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी क्रॅक सुद्धा गेलेले दिसून येतात. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीकडे पत्र सुद्धा दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे आता दिसून येत आहे.

त्यामुळे मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून कामाचा दर्जा दाखवत नसतील शेवटी खळ्ळ खट्याक करावे लागेल असा इशाराच मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

कल्याणमधील निकृष्ट कामावर राजू पाटील आक्रमक

डोंबिवलीतील एमआयडीसी विभागातील सुयोग हॉटेल ते पेंढरकर कॉलेज रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. पीडब्लूडी विभागाकडून हे काम केले जात आहे. स्थानिक रहिवाशांनी या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली होती. रस्त्याचं काम होत असल्यानं रस्त्याची उंची वाढत आहे. त्यामुळे रस्त्याच्या आजूबाला पाण्याचा निचरा होण्यासाठी कलवर्टची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात अशी व्यवस्थाच नसल्याची तक्रार नागरिकांनी केलीय. तसेच कलवर्ट नसतील तर पाण्याचा निचरा कसा होणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरिकांनी आमदार राजू पाटील यांच्याकडेच यावर उपाययोजना करण्याची मागणी केलीय.

पाण्याचा निचरा झाला नाही, तर अनेक समस्या उद्भवतील. रस्त्याचे काम करताना त्यासाठी आधी रस्ता पूर्णपणे खोदून नंतर त्यावर भराव टाकला गेला पाहिजे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच एकावर एक थर अंथरुन काम केलं जात आहे. रस्ता उंच झाला असून नागरिकांच्या वसाहती असलेलं शहर खाली जात चाललं आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहराला खड्ड्यात टाकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केलाय.

(MNS MLA Raju Patil Warns MSRDC Over road work)

हे ही वाचा :

‘रस्ता झाला उंच, शहर गेलं खड्ड्यात’, कल्याणमधील निकृष्ट कामावर मनसे आमदार राजू पाटील आक्रमक

सरकारच्या दुर्लक्षामुळे स्वखर्चातून उभारणार आगरी कोळी-वारकरी भवन, मनसे आमदाराची माहिती

डोंबिवलीत निळे रस्ते; अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही का?; मनसे आमदाराचा आदित्य ठाकरेंना सवाल

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.